लग्नानंतर किचनमध्ये पहिलीच ‘एंट्री’… घाबरु नका, ही ‘स्वीट डिश’ ट्राय करा

लग्नानंतर नववधू जेव्हा पहिल्यांदाच स्वयंपाकगृहात जाते तेव्हा मनात एक दडपण असतं. पहिला पदार्थ कोणता बनवावा, तो सर्वांना आवडेल की नाही. अनेक वेळा गोंधळल्यासारखं होत असतं. सुनेच्या हातची चव चाखण्यासाठी सर्व मंडळीदेखील आतूर असतात.

लग्नानंतर किचनमध्ये पहिलीच ‘एंट्री’... घाबरु नका, ही ‘स्वीट डिश’ ट्राय करा
sweet-recipe
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 10:08 AM

मुंबई :  लग्नानंतर पहिले काही दिवस नववधूसाठी महत्वाचे असतात. घर व घरातील मंडळी सर्वकाही नवीन असत. प्रत्येकाचा स्वभाव आवडीनिवडी वेगवेगळ्या असू शकतात. त्या सर्व समजून घेउन प्रत्येकाशी एक नव्या नात्याची सुरुवात करावी लागत असते. परंतु सर्वांत गोंधळात (confusion) टाकणारी गोष्ट असते ती सासरी पहिल्यांदाच स्वयंपाक घरात शिरल्यावर नेमक काय गोडधोड करावे? नेहमीचे पदार्थ करणे टाळत काहीतरी स्पेशल (Special) करण्याकडे मुलींचा कल असतो. अनेकदा मुलींमध्ये न्यूनगंड असतो. आपण केलेला पदार्थ सासरच्यांना आवडेल की नाही, लग्न आणि लग्नानंतरच्या विधींबद्दल मुलींमध्ये प्रचंड भीती असणे साहजिकच आहे. मुलींसाठी हे एक मोठं काम आहे, की काय स्पेशल बनवायचं जेणेकरून त्या सगळ्यांची मने जिंकू शकतील. बहुतेक घरांमध्ये पहिल्यांदा स्वयंपाकघरात गेल्यावर नवीन सुनेकडून गोडधोड खायला मिळेल अशी सर्वांचीच अपेक्षा असते. याबाबत आज आपण काही खास ‘रेसिपी’(Recipe) बघणार आहोत.

1) आंबा बर्फी

साहित्य

1- खवा – अर्धा किलो

२- पिकलेला आंबा – 1 मोठा

3- साखर – 5 चमचे

4- वेलची पावडर – 1 चमचा

5- पिस्ता – सजावटीसाठी

6- तूप – 1 टेस्पून

कृती

सर्वप्रथम आपण एका पातेल्यात खवा घेऊन मंद आचेवर भाजावा. त्याचा रंग गुलाबी होईपर्यंत त्याला हलवत रहावे, त्यानंतर आंबा सोलून त्याचे तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये टाकून त्याची प्युरी करा. नंतर दुसर्‍या पॅनमध्ये आंब्याची प्युरी आणि साखर घालून मंद आचेवर ठेवा. घट्ट होईपर्यंत त्याला तसेच राहू द्यावे, नंतर थंड करा, आता खवा आणि प्युरी थंड झाल्यावर एकजीव करा. यानंतर एका प्लेटमध्ये तूप लावून सर्व मिश्रण टाकून सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर हवा तसा आकार द्यावा, आंबा बर्फी खाण्यासाठी तयार आहे.

2) ब्रेड रसमलाई

साहित्य-

1- ब्रेड स्लाइस – 8

2- फुल क्रीम दूध – 2 लीटर

3 -साखर – 1 कप

4- पिस्ता – 1 चमचा

5- काजू – 1 चमचा

6- वेलची पावडर – 1 चमचा

7- गुलाब जल – 1/2 चमचा

८- केशर

कृती

सर्व प्रथम एका खोल आणि जाड भांड्यात सर्व दूध काढून मंद आचेवर गरम करावे, नंतर दुधाला उकळी आल्यावर दुधात 1 चमचा केशर टाका. यानंतर उकळत असलेल्या दुधात साखर आणि वेलची पूड घाला आणि नंतर दूध ढवळत राहा. नंतर ब्रेडच्या स्लाइसचे गोल काप करून घ्या. दूध उकळल्यावर गॅस बंद करा काही कालावधीनंतर हे दूध फ्रीजमध्ये ठेवा आणि चांगले थंड करा. नंतर ‘सर्व्हिंग डिश’मध्ये, ब्रेडचे तुकडे चांगले सजवा नंतर ब्रेडच्या तुकड्यांवर दूध टाका. नंतर पिस्ता आणि बदाम टाकून सजवल्यानंतर ब्रेड रसमलाई खाण्यासाठी तयार आहे.

इतर बातम्या-

Change Environment : थंडी गायब, पारा चढला, कृषी शास्त्रज्ञांचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, कोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.