AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!

महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपचार करतात. 30 वर्षांनंतर स्त्रियांच्या त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात.

Makeup Tips | वयाच्या चाळीशीतही सुंदर दिसायचंय? तर मेकअप करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात!
तजेलदार त्वचा
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:33 PM

मुंबई : महिला आपली त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नेहमीच वेगवेगळे उपचार करतात. 30 वर्षांनंतर स्त्रियांच्या त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात. वयाच्या 40व्या वर्षानंतर त्वचेवर सुरकुत्या, आणि बारीक रेषा देखील दिसू लागतात. कधीकधी तणाव आणि खराब जीवनशैलीमुळे वृद्धत्वाची चिन्हे वयापूर्वीच त्वचेवर उमटू लागतात. अर्थात अकाली वृद्धत्वाकडे आपली त्वचा झुकू लागते. याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो (Makeup Tips For younger looking skin at the age of 40).

जरी आपण वयानुसार येणारे म्हातारपण रोखू शकत नाही, परंतु आपण आपल्या मेकअपचा वापर करुन स्वतःला तरूण भासवू शकता. चला तर, जाणून घेऊया या काळात त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी आपण कोणत्या मेकअप टिप्स वापरू शकता त्याबद्दल…

आय 4मेकअप

डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आपण कन्सीलर वापरू शकता. पापण्याचे केस कर्ल करणे विसरू नका. यामुळे डोळ्यांना एक उठावदार लूक मिळतो. नेहमी आय लायनर आणि शॅडो जेल बेसचा वापर करा. डोळ्यांभोवतीच्या बारीक बारीक सुरकुत्या लपवण्यासाठी आपण कन्सीलर वापरू शकता.

भुवयांकडे विशेष लक्ष द्या.

आयब्रो पेन्सिलच्या मदतीने आपण आपल्या भुवया उठावदार बनवू शकतो. यासाठी प्रथम पेन्सिलच्या सहाय्याने भुवयांना आकार द्या. या व्यतिरिक्त, हाइलायटर डोळ्याच्या वर आणि खाली देखील वापरला जाऊ शकतो. यामुळे आपला चेहरा डार्क आणि चमकदार होईल.

फिकट लिपस्टिक लावा.

दात चमकदार दिसण्यासाठी नेहमीच हलकी शेड असणारी लिपस्टिक लावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांना हायड्रेट करणे लक्षात ठेवा. हायड्रॅटींगच्या 10 मिनिटांपूर्वी ओठांना मलम किंवा नारळ तेलाने मालिश करा (Makeup Tips For younger looking skin at the age of 40).

लाईट फाउंडेशन

आपली त्वचा तरुण दिसण्यासाठी, फिकट आणि त्वचेच्या टोननुसार फाउंडेशन लावा. आपण त्वचेला तरुण भासवण्यासाठी बीबी किंवा सीसी क्रीम लावू शकता.

बेसन आणि हळद फेसपॅक

बेसन, एक चिमूटभर हळद, दही, दूध, लिंबू आणि मध मिसळून फेसपॅक तयार करा. आंघोळ करण्यापूर्वी तो चेहऱ्यावर लावा आणि पूर्णपणे कोरडा होऊ द्या. चेहऱ्यावर फेसपॅक असताना कोणाशीही बोलू नका. फेसपॅक पूर्णपणे सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

आहारातही बदल आवश्यक!

जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा. चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.

(टीप : सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Makeup Tips For younger looking skin at the age of 40)

हेही वाचा :

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....