Beauty Benefits : चेहरा उजळवण्यासाठी सकाळी-सकाळी थंड पाण्याने तोंड धुवा, सौंदर्य प्रसाधने कायमची विसरा
झोपेतून उठल्यानंतर आपला चेहरा सुजल्यासारखा वाटतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्वचेमध्ये नवीन पेशी तयार होत असतात.
मुंबई : झोपेतून उठल्यानंतर आपला चेहरा सुजल्यासारखा वाटतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्वचेमध्ये नवीन पेशी तयार होत असतात. त्यावेळी, त्वचेवरी रोमछिद्र थोडी मोठी होतात, ज्यामुळे आपला चेहरा काहीसा जाडसर होतो आणि तो सूजल्यासारखा दिसतो. चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी आपण थंड पाण्याने आपला चेहरा धुतला पाहिजे. झोपेतून उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुण्याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला होतात. (Many benefits of washing face with cold water)
त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते.
वृद्धत्वाची समस्या दूर करण्यासाठी सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. हे चेहरा घट्ट करते आणि त्वचेचे छिद्र लहान करते. थंड पाण्यामुळे रक्त परिसंचरण वाढते. यामुळे त्वचा चांगली आणि चमकदार राहते.
स्किन पोर्स बंद होतात
थंड पाण्याने चेहरा धुण्याने स्किन पोर्स बंद होतात. यामुळे त्वचेत घाण आणि तेल जमा होत नाही. ज्यामुळे पुरळ आणि मुरुमांचा त्रास होत नाही.
त्वचेचा रंग उजळतो
दररोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्याचा रंग देखील उजळतो. मात्र, सकाळी चेहरा धुताना साबण लावणे टाळले पाहिजे. चेहरा फक्त पाण्यानेच धुवा.
सुरकुत्या कमी होतील
थंड पाणी एक उत्कृष्ट अँटी रिंकल क्रीम सारखे कार्य करते. हे आपल्या त्वचेला चमकदार बनवते आणि स्कीन बूस्ट करते. तसेच, त्वचेला ताजेतवाने आणि तरूण बनवते. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. सकाळी उठल्यानंतर दररोज आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहर्यावर एक वेगळ्या प्रकारचा तजेला येईल.
टॅनिंग कमी होईल
जर आपला चेहरा उन्हामुळे टॅन/गडद झाला आहे असे वाटत असेल, तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतले पाहिजे. ते आपल्या त्वचेसाठी ढाल अर्थात शील्ड म्हणून काम करेल. थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते. वास्तविक, थंड पाणी हळूहळू आपल्या उन्हाने बाधित त्वचेला मृत पेशींमध्ये रुपांतरित करते. जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Many benefits of washing face with cold water)