पुरुष नेहमी ‘या’ चुका करतात, लक्ष द्या आणि जाणून घ्या कशी काळजी घ्यावी?
कारण बहुतेक पुरुष आपली त्वचा ओळखत नाहीत. त्वचा कशी आहे तेच माहिती नसल्यामुळे त्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. चला तर मग जाणून घेऊया पुरुषांनी त्वचेची कशी काळजी घ्यावी?
मुंबई: पुरुष त्वचेबाबत नेहमीच बेफिकीर असतात, तर काही पुरुष आपला चेहराही नीट धुवत नाहीत. ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण बहुतेक पुरुष आपली त्वचा ओळखत नाहीत. त्वचा कशी आहे तेच माहिती नसल्यामुळे त्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. चला तर मग जाणून घेऊया पुरुषांनी त्वचेची कशी काळजी घ्यावी?
त्वचेबाबत पुरुषांनी करू नये ‘या’ चुका
त्वचेचा प्रकार न ओळखणे
काही पुरुषांना वाटते की त्यांची त्वचा महिलांपेक्षा जास्त तेलकट आहे, त्यामुळे त्यांना जास्त क्रीम किंवा लोशनची आवश्यकता नसते. परंतु असे नाही. होय, पुरुषांच्या त्वचेलाही ओलावा आवश्यक असतो. त्यामुळे क्रीम न लावल्यास चेहरा कोरडा पडतो. त्यामुळे पुरुषांच्या क्रीमचा वापर करायलाच हवा.
शेव्हनंतर आफ्टरशेव्ह लावू नका
काही पुरुष दाढी करण्यासाठी लोशनचा वापर करत नाहीत. कारण शेव्हिंग केल्यानंतर लोशन लावण्याची गरज नाही, असे त्यांना वाटते, पण तसे वाटणे चुकीचे आहे. होय, शेव्हिंग नंतर लोशन वापरा.
शेव्हिंग क्रीम लावण्याची चूक
हल्ली पुरुष शेव्हिंग फोम वापरू लागलेत. त्यानंतर लगेचच ते दाढी करायला सुरुवात करतात. यामुळे त्वचेची जळजळ होते. त्यामुळे आधी दाढी कोमट पाण्याने सॉफ्ट करा,ओली करा आणि त्यानंतरच शेव्हिंग क्रीम लावा.
सनस्क्रीनचा वापर न करणे
सनस्क्रीन फक्त स्त्रियाच लावतात असा पुरुषांचा समज असतो. पण उन्हात सनस्क्रीन न लावल्यास डार्क स्पॉट आणि हाइपपिमेंटेशन समस्या सुरू होते. त्यामुळे नेहमी उन्हात सनस्क्रीनचा वापर करावा. असे केल्याने तुमची त्वचा निरोगी होईल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)