Mental Health: कामाच्या ठिकाणी स्ट्रेस येऊ नये म्हणून अशी घेतली पाहिजे काळजी
Mental Health : कामाच्या ठिकाणी अनेकांना स्ट्रेस येत असतो. पण नोकरी वाचवण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्ट्रेस येऊ नये म्हणून आधीच काही काळजी घेतली जावू शकते. कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला काही टीप्स देणार आहोत. या टीप्स तुम्हाला स्ट्रेस फ्री राहण्यासाठी मदत करु शकतात.
Mental Health : दिवसातील सर्वाधिक वेळ आपण आपल्या ऑफिसध्ये घालवतो. त्यामुळे ऑफिसमधल्या वातावरणाचा आपल्यावर मानसिक परिणाम होत असतो. आपल्या मानसिक आरोग्यावर कामाचा दबावही खूप वाढला आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे आता गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी आपले मानसिक आरोग्या चांगले राहावे यासाठी काही उपाय केले पाहिजे.
मानसिक आजाराचा आपल्या शरिरावर देखील परिणाम होत असतो. या आजारपणामुळे आपली तणावाची पातळी वाढते. म्हणून आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. यासाठी व्यायाम आणि सकस आहार खूप महत्त्वाचा आहे.
विश्वासू मित्राशी बोला
ऑफिसमध्ये कामाचा ताण जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रासोबत नक्कीच संवाद साधू शकता. कोणतीही समस्या असेल तर मदत मागायला लाजू नका. मित्र कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यास मदत करू शकतात. मित्रासोबत बोलून तुम्हालाही मन मोकळे झाल्यासारखे वाटेल
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
धूम्रपान आणि मद्यपान केल्याने मानसिक आजारांपासून दूर राहता येते असा समज चुकीचा आहे. हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे तुम्हाला थोड्या काळासाठी बरे वाटू शकते, परंतु भविष्यात यामुळे समस्या वाढेल.
विश्रांती घ्या
काम करत असताना मधल्या वेळेत 10-15 मिनिटे डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुमचा मानसिक थकवाही जाणवणार नाही. काही वेळ डोळे बंद करुन बसल्याने तुम्हाला छान वाटेल. मध्ये वेळ मिळाला तर थोडा वेळ बाहेर फिरू शकता. यामुळे तुमचा मूडही सुधारू शकतो.
सीमा तयार करा
कामाचा लोड असला तरी काही लोकं नाही म्हणायला लाजतात. पण असं करु नका. तुम्हाला एखादे काम करत असताना जर त्रास होत असेल तर तसे त्यांना सांगा. कामाची सीमा तयार करुन घ्या. चांगलं काम करण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. काम वेळेत संपत नसेल तर किती वेळ द्यायचा याचं बंधन घालून द्या. ऑफिसमधील तुमच्या सहकाऱ्यांसोबत सीमारेषा ठरवणे अत्यंत आवश्यक आहे.