पहिल्यांदाच करणार असाल फेशिअल वॅक्स, तर ‘या’ गोष्टी विसरू नका
अनेक महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग करतात. पण या दरम्यान झालेली एक छोटीशी चूक चेहऱ्याला नुकसान पोहोचवू शकते. म्हणून, फेशियल वॅक्सिंग करताना आणि नंतर या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण सुंदर दिसावं, त्यासाठी ती पूर्ण काळजी घेत असते. बऱ्याचदा महिलांना सुंदर दिसण्यासाठी काही दिवस आगोदरच खास प्रकारचे उपचार घ्यावे लागतात. प्रत्येक महिला पार्लरमध्ये फेशियल, आयब्रो आणि वॅक्सिंग करून घेतात. पण काही महिला या चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सचा वापर देखील करतात.
जेव्हा चेहऱ्यावरील केस थ्रेडने सहज काढता येत नाहीत, तेव्हा वॅक्सचा वापर केला जातो. आजकाल अनेक महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सिंग करतात. पण या दरम्यान कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा केला तर ते त्वचेलाही नुकसान पोहोचवू शकते. त्यातच तुम्ही जर पहिल्यांदाच तुमच्या चेहऱ्याचे फेशिअल वॅक्सिंग करण्यासाठी चेहऱ्यावर वॅक्स लावण्याचा विचार करत असाल, तर या काळात या गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
योग्य वॅक्स निवडा
चेहऱ्यासाठी नेहमी मऊ वॅक्स, कोरफड किंवा फळांचे वॅक्स वापरा. चेहऱ्यावर कडक वॅक्स किंवा बॉडी वॅक्स लावू नये. चेहऱ्यासाठी खास वॅक्सच्या पट्ट्या देखील बाजारात उपलब्ध आहेत ज्या चेहऱ्यावर हलक्या असतात.
तुमच्या त्वचेच्या प्रकाराची काळजी घ्या
तुम्ही जर पहिल्यांदाच तुमच्या चेहऱ्यावर वॅक्स लावणार असाल तर त्यानुसार वॅक्स निवडा. याशिवाय, जर तुम्हाला कोणतीही ऍलर्जी असेल, त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर प्रथम त्वचा तज्ञांचा सल्ला घ्या. कारण जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले तर ते तुमच्या चेहऱ्याला नुकसान पोहोचवू शकतात.
स्क्रब आणि ब्लीच
वॅक्सच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी तुमचा चेहरा स्क्रब करा किंवा ब्लीच लावा. असे न केल्याने फेशिअल वॅक्सिंग करताना त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणून याची विशेष काळजी घ्या. यामुळे त्वचेतील मृत पेशी कमी होण्यास आणि चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. पण हे वॅक्सिंग करण्यापूर्वी आणि नंतर स्क्रब आणि ब्लीच करू नये.
तापमान चेक करणे
तुम्ही जर फेशियल वॅक्सिंगसाठी हॉट वॅक्स वापरत असाल तर ते चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्याचे तापमान तपासा. विशेषतः तुमची त्वचा अधिक संवेदनशील असेल तर खूप गरम वॅक्स त्वचेला भाजू शकते. म्हणून, प्रथम तुमच्या हातावर वॅक्स लावण्याचा प्रयत्न करा आणि कधीही स्वतः चेहरा वॅक्स करू नका. त्यापेक्षा ते स्टायलिस्टकडून वॅक्सिंग करून घ्या.
वारंवार तोंडाला स्पर्श करू नका
यासोबतच वॅक्सिंग केल्यानंतर चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका. यामुळे संसर्ग किंवा पुरळ येऊ शकते. कारण वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा अधिक संवेदनशील होते आणि तिला वारंवार स्पर्श केल्याने संसर्गाचा धोका वाढतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)