दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर दुधात तूप मिक्स करून प्या, होतील आश्चर्यकारक फायदे !

आपण जर आठ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे.

दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर दुधात तूप मिक्स करून प्या, होतील आश्चर्यकारक फायदे !
झोप
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 11:41 AM

मुंबई : आपण जर आठ तासांपेक्षा कमी झोप घेत असाल, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. यात असेही लोक आहेत जे, 8-9 तासांपेक्षा कमी झोपतात आणि त्यांना दिवसा झोप येत राहते. मात्र, दिवसाच्या झोपेपेक्षा कधीही रात्रीची शांत झोप चांगली असते. बरेचजण असे आहेत, ज्यांना रात्री झोपच लागत नाही. मग याचा परिणाम त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. (Mix ghee in milk and drink every night before going to Sleep)

या सध्याच्या काळात तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे. यासाठी पुरेशी आणि चांगली झोप आवश्यक असते. रात्री अनेक प्रयत्न करूनही झोप लागत नसेल तर झोपण्याच्या दहा ते वीस मिनिटे अगोदर आपण दुधामध्ये तूप मिक्स करून पिले पाहिजे. यामुळे आपल्याला लवकर झोप लागण्यास मदत होते. एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यामध्ये गरम केलेले तूप मिक्स करा आणि हे प्या. यामुळे आपली झोप न लागण्याची समस्या दूर होईल. तूप आपले संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण करते.

यात बुटेरिक अॅसिड असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तूपामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व अ आणि सी असते, जे रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दूध स्वतःच एक संपूर्ण अन्न मानले जाते. प्रथिने, चरबी, कॅलरीज, कॅल्शियम, व्हिटामिन डी, बी-2, बी-12, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियम यासारख्या पोषक घटकांमुळे दुधाची गुणवत्ता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पाचन क्रिया मजबूत होते. त्यात अँटीफंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत जे रोग रोखण्यात मदत करतात.

झोपेची कमतरता असल्यास भूक वाढवणारे हार्मोन वाढतात. एका संशोधनात असेही समोर आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी झोपू शकत नाही, तेव्हा शरीरात घ्रेलिन संप्रेरक वाढतो आणि लेप्टिन संप्रेरकाची कमतरता सुरू होते. लेप्टिन भूक कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. तर, घ्रेलिन एक वेगाने वाढणारे हार्मोन आहे, जे भूक वाढवते आणि वजन वाढण्यास जबाबदार असते. टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका देखील वजन वाढल्यामुळे लक्षणीय वाढला आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!

(Mix ghee in milk and drink every night before going to Sleep)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.