हिवाळ्यात आवर्जून करा मिक्स व्हेज पराठा, चवीसोबतच आरोग्याची ही घेईल काळजी
रोज सकाळी नाश्ता करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. पण नाश्तामध्ये रोज सकाळी काय नवीन बनवायचे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर मिक्स व्हेज पराठ्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. हिवाळ्यामध्ये हा नाश्ता खूप चविष्ट लागतो. यामध्ये असलेल्या भाज्यांच्या विविधतेमुळे तो एक आरोग्यदायी नाश्ता बनतो आणि शरीराला पोषक तत्वांची कमतरता भासू देत नाही. जाणून घेऊया पराठा तयार करण्याची रेसिपी.
रोज सकाळी नाश्ता करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सकाळी नाश्ता करणे हा आरोग्यासाठी आवश्यक आहे. पण सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक घरात अगदी रोज पडतो. दररोज काहीतरी नवीन आणि चविष्ट नाश्ता बनवणे थोडे कठीण आहे. यावेळेस मिक्स भेट पराठा तुम्ही नक्की बनवू शकता हा पराठा चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला देखील नाश्त्यात काही वेगळे करून पाहायचे असेल तर तुम्ही मिक्स व्हेज पराठा नक्की करून पाहू शकता. तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठीच नाही तर दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात देखील बनवू शकता.
साहित्य
- कांदा (बारीक चिरलेला) १/२ कप
- हिरवी मिरची (बारीक चिरलेली) १ते २
- आले (किसलेले) – १ इंच तुकडा
- कोथिंबीरची पाने (बारीक चिरून)
- धणे पावडर – १/२ टीस्पून
- लाल मिरची पावडर – 1/4 टीस्पून
- गरम मसाला – 1/4 टीस्पून
- सुक्या आंबा पावडर – 1/4 टीस्पून
- मीठ – चवीनुसार
- तेल – तळण्यासाठी
- मैदा: २ वाट्या
- तेल: 2-3 चमचे
- मीठ: चवीनुसार
- पाणी : गरजेनुसार
- बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले) (किसलेले) 1 कप गाजर
- फुलकोबी (किसलेले) १/२ कप
- वाटाणे १/२ कप
हे सुद्धा वाचा
कृती
- सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मैदा मीठ आणि तेल घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात हळूहळू पाणी घालून पीठ मऊ मळून घ्या. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे पीठ झाकून बाजूला ठेवा.
- आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि आले घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात किसलेल्या भाज्या घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. नंतर सर्व कोरडे मसाले आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. शेवटी बटाटे आणि वरून कोथंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
- नंतर भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा. हे गोळे लाटून त्यावर तयार भाजीचे मिश्रण मधोमध भरा आणि कडा दुमडून त्याला गोल आकार द्या.
- यानंतर पॅन गरम करून त्यावर पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- आता गरमागरम मिक्स व्हेज पराठा दही किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करा.
टिप्स
- हा पराठा बनवताना तुम्ही तुमच्या आवडीची कोणतेही भाजी वापरू शकता.
- कमी तेलात पराठा बनवायचा असेल तर तव्यावर थोडे तेल लावून पराठा भाजून घ्या.
- या पराठ्यामध्ये तुम्ही पनीर आणि मटार देखील टाकू शकता.
- हा पराठा तुम्ही नाश्ता आणि दुपारच्या जेवणात खावू शकता.