हात धुतल्यानंतर मॉइस्चराइज करणं जरुरी, वाचा काय कारण?

कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांना हात धुण्याची जास्त सवय लागली आहे.

हात धुतल्यानंतर मॉइस्चराइज करणं जरुरी, वाचा काय कारण?
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 10:26 AM

मुंबई : कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. त्यामध्ये आपल्या सर्वांना हात धुण्याची जास्त सवय लागली आहे. आपण हात वेळोवेळी धुतल्याने हातावरील जंतूंचा नाश होता. परंतु यामुळे आपली त्वचा जास्त कोरडी पडते आणि त्वचेचा ओलावा नाहीसा होतो. परंतू सध्या असलेल्या परिस्थितीमुळे आपण हात धुणेही बंद करू शकत नाहीत. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हात वारंवार हात धुतल्यानंतर आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी. (Moisturize your hands after washing Know the reason)

-हात धुतल्यानंतर शक्यतो मॉइश्चरायझिंग केले पाहिजे. कारण मॉइश्चरायझिंग आपल्या त्वचेच्या ओलावा संतुलित करण्यास मदत करते आणि त्यांना कोमल आणि हायड्रेटेड ठेवते. त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि कोरडेपणा टाळण्यासाठी आपण आपले हात मॉइश्चरायझिंग केले पाहिजे. साबणामध्ये वापरले जाणारे रसायने केवळ जंतुनाशकांना ठार मारत नाहीत तर वारंवार साबणाने हात धुतल्याने हात कोरडे पडतात. कमीतकमी रसायने आणि क्लींजिंग गुणधर्मांसह आपण आपल्या त्वचेसाठी योग्य मॉश्चरायझिंग क्रीम निवडणे देखील महत्वाचे आहे.

-उन्हाळ्यात शरीराला भरपूर पाण्याची गरज असल्याने खूप पाणी प्यायले जाते. परंतु, हिवाळ्यात थंडीमुळे तहान कमी लागते आणि कमी पाणी शरीरात जाते. परंतु हे त्वचेसाठी घातक ठरते. हिवाळ्यातही हवा कोरडी असल्याने शरीराला अधिक पाण्याची गरज असते. कोरड्या हवामानामुळे शरीरातील पाणी कमी होते. अशा परिस्थितीत, शरीरात ओलावा टिकवण्यासाठी आपण जास्तीत जास्त पाणी पिणे महत्वाचे आहे. या दिवसांत दर तासाला एक ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

-अंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करा. यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनेल. याला दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑईल किंवा आपल्या आवडत्या कोलनचे काही थेंब टाकून अंघोळ करणे. अंघोळीसाठीचे पाणी जास्त गरम नसावे. गरम पाणी त्वचेचा नरमपणा काढून घेते आणि त्वचेला जास्त शुष्क बनवते. कारण गरम पाण्याने स्नान केल्यामुळे प्राकृतिक तेल नष्ट होते. अंघोळीच्या पाण्यात दोन टीस्पून मध घातल्याने त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Diabetes Diet : मधुमेहाचे रुग्णांनी हे फळ खाल्ल्यास होतील फायदे, शुगर नियंत्रणात राहिल

(Moisturize your hands after washing Know the reason)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.