मोलनूपिराविर औषध कोविड-19 व्हायरसवर प्रभावी? कोरोना विषाणूवर कशा प्रकारे मिळवते नियंत्रण? समजून घेऊया

मोलनूपिराविर हे कोविड 19 वर नव्याने बाजारात आलेले प्रतिबंधक औषध या आठवड्यापासून सर्व मेडिकल स्टोरवर उपलब्ध होईल. मोलनूपिराविर ड्रग नेमके काय आहे? हे औषध आपल्याला व्हायरसपासून कसे वाचवते? हे औषध नेमके कोण सेवन करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

मोलनूपिराविर औषध कोविड-19 व्हायरसवर प्रभावी? कोरोना विषाणूवर कशा प्रकारे मिळवते नियंत्रण? समजून घेऊया
मोलनुपिराविर हे एक अँटीवायरल ड्रग आहे
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 12:45 PM

मुंबई : मोलनुपिराविर हे एक अँटीवायरल ड्रग आहे. कोविड प्रतिबंधक औषध मोलनुपिराविर या हफ्त्यापसून सर्व मेडिकल स्‍टोरवर उपलब्ध होईल. नुकतेच ड्रग कंट्रोलर अथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील फार्मा कंपन्यांना हे औषध बनवण्यास आणि विकण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये डॉ. रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हीटेरो, टॉरेंट आणि ऑप्टिमस सोबतच 13 कंपन्यांचा समावेश आहे. फार्मा कंपनींनी मोलनुपिराविरची एक कॅप्सुल तयार केली आहे, त्याची किंमत 35 ते 63 रुपये प्रति कॅप्सुल इतकी आहे. (Molnupiravir : What is the COVID 19 pill and how does it work?)

मोलनूपिराविर ड्रग नेमके काय आहे? हे औषध आपल्याला व्हायरसपासून कसे वाचवते? हे औषध नेमके कोण सेवन करू शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.

मोलनुपिराविर नेमके काय आहे आणि कशा प्रकारे काम करते?

हे एक अँटीवायरल ड्रग आहे. या औषधाला फ्लू म्हणजेच इंफ्लुएंजावर निदान करण्यासाठीं विकसित करण्यात आले होते. हे एक ओरल ड्रग आहे. याचा वापर कोविड-19 ची सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर केला जात आहे. याचा कोर्स पूर्ण पाच दिवसांचा असतो.

आता जाणून घेऊया हे औषध कशा पद्धतीने काम करते, सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास मोलनुपिराविर संक्रमण झाल्यावर वायरसला त्याची संख्‍या वाढवण्यापासून प्रतिबंध करते. जेव्हा वायरस शरीरामध्ये पोहोचतो तेव्हा ते आपले जीनोम रेप्लिकेट करते. जिनोमच्या साहाय्याने ते आपली संख्या वाढवतात. जीनोम जेवढा जास्त रेप्लिकेट होतो तितकेच या जीनोमची संख्‍या देखील वाढू लागते, संख्या वाढल्यावर हा व्हायरस संपूर्ण शरीरामध्ये पसरून जातो.

मोलनुपिराविर औषध जेव्हा आपल्या शरीरामध्ये पोहोचते तेव्हा कोरोनाद्वारे संक्रमित कोशिका यांना शोषून (एब्‍जॉर्ब) करून घेते. औषध सेवन केल्यामुळे संक्रमित झालेल्या कोशिकांमध्ये एका प्रकारचा दूषितपणा निर्माण होतो आणि यामुळे वायरसची संख्या वाढत नाही म्हणूनच औषधाचा प्रभाव जेव्हा पूर्ण शरीरावर होतो तेव्हा या वायरसवर कंट्रोल केला जातो आणि म्हणूनच शरीरातील वायरल लोड हळूहळू कमी होऊ लागतो.

मोलनुपिराविर लाभदायक आहे का?

या औषधांची ट्रायल कोविड रुग्णांवर केली गेली आहे. 2021 मध्ये या ट्रायलचे परिणाम समोर आले होते. जे काही परिणाम समोर आले, त्यांच्या आधारे ज्या रुग्णांना हे औषध दिले गेले नव्हते त्यातील 14 टक्के लोक एकतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले अथवा या रुग्णांचा मृत्यू झाला.

तसेच ज्या रुग्णांना मोलनुपिराविर हे औषध दिले गेले होते त्यांच्यातील फक्त 7.3 % रुग्णांसोबतच असे काही घडले होते. ही औषधं बनवणारी अमेरिकी फार्मा कंपनी मर्क यांचे म्हणणे आहे की, मोलनुपिराविर झालेले क्लीनिकल आणि प्री क्लिनिकल ट्रायल परिणाम सांगतात की, हे औषध कोरोनाच्या अनेक वेरिएंटवर लाभदायक आहे. या वेरिएंटमध्ये डेल्‍टा, गामा आणि म्‍यू यांचा समावेश आहे.

ही औषधं कोण सेवन करू शकतो?

देशात मोलनुपिराविरला इमरजेंसीमध्येच वापर करण्यास परवानगी मिळालेली आहे. ज्या वृद्ध व्यक्तींच्या शरिरात संक्रमण वाढण्याचा जास्त धोका आहे अशा वृद्ध व्यक्तींवरच या औषधांचा प्रयोग केला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन असेल तरच तुम्हाला हे औषध मेडिकल स्टोअरद्वारे मिळू शकेल अन्यथा हे औषध तुम्हाला विकत घेता येणार नाही.

इतर बातम्या

Menstrual Cycle | मासिक पाळीमध्ये जास्त त्रास होतो ? महिलांनी ‘ही’ काळजी घ्यायला हवी

Pregnancy | नॉर्मल डिलिव्हरी हवीय? मग या गोष्टी नक्की करा

तुमच्याकडे गोड बातमी आहे..? मग चुकूनही पहिल्या 3 महिन्यात हे करू नका…

(Molnupiravir : What is the COVID 19 pill and how does it work?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.