Tourist Places : भारतातील ‘या’ 5 नयनरम्य ठिकाणी फिरायला गेलच पाहिजे

Tourist Places : फक्त तरुणांनाच नाही तर अनेकांना फिरण्याची आवड असते, त्यामुळे परदेशात न जाता भारतातील 'या' पाच ठिकाणी एकदा तरी नक्की फिरुन या..., शहराचं सौंदर्य, तेथील वेगळेपण, परंपरा आणि पदार्थ... इत्यादी गोष्टींचा घेता येईल अनुभव

Tourist Places : भारतातील 'या' 5 नयनरम्य ठिकाणी फिरायला गेलच पाहिजे
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 1:21 PM

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : कधीही फिरायला जायचा विषय निघाला तर, कुठे आणि कसं जायचं यावर चर्चा सुरु होते. भारतामध्ये पर्यटकांना निवडण्यासाठी असंख्य पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही भव्य पर्वत, नैसर्गिक सौंदर्य, धबधबे, समुद्रकिनारे, गजबजणारी शहरे आणि शांत ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या वास्तूंचा आनंद घेऊ शकता. तुम्ही देखील मित्र, कुटुंब किंवा सोलो पर्यटक स्थळी जाण्याची योजना करु शकता… भारतातील असे 5 पर्यटन स्थळे आहे, जेथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. तर जाणून घेऊ भारतातील पास बेस्ट पर्यटन स्थळे…

काश्मीर देखील फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. शहराची शांतता आणि सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काश्मीरला जाऊ शकता. येथे नद्या, नयनरम्य धबधबे, दऱ्या आणि हिरवीगार जंगले पाहून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल.

कुर्ग देखील अतिशय सुंदर ठिकाण आहे. जर तुम्हाला रोजच्या जिवनाचा आणि शहरांच्या गजबजाटापासून दूर राहायचं असेल तर कुर्ग एकमेव ठिकाण आहे. कुर्ग हिरवाई आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. कर्नाटकच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले कूर्ग हे अतुलनीय सुंदर हिरवेगार आणि कॉफीचे उत्पादन करणाऱ्या हिल स्टेशनसाठी प्रसिद्ध आहे.

अशात तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर, कुर्ग देखील उत्तम पर्याय आहे. कुर्ग येथे फिरण्यासाठी गेल्यानंतर तुम्ही ॲबे फॉल्स, बारापोल नदी, ब्रह्मगिरी शिखर, इरुप्पू फॉल्स आणि नागरहोल नॅशनल पार्क यासह अनेक ठिकाणांना भेट देण्याची योजना करू शकता.

आसाम देखील फिरण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे. अनेक पर्वत आणि समुद्र किनारे पाहायचे असतील तर तुम्ही आसाम येथे जाऊ शकता. आध्यात्मिक वातावरणात सुखदायक सौंदर्य आणि शांतता अनुभवण्यासाठी तुम्ही आसाममध्ये जाऊ शकता. आसाममध्ये अनेक वन्यजीव अभयारण्ये आहेत ज्यात एक शिंगे असलेल्या गेंड्यांचे निवासस्थान आहे.

मनाली देखील फिरण्यासाठी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही मित्रांसोबत मनाली याठिकाणी जात असाल तर, तुमच्या आयुष्यातील ही बेस्ट ट्रिप ठरु शकते. बियास नदी, सभोवतालचे पर्वत, आल्हाददायक हवामान आणि सौंदर्याने मनाली पर्यटकांची मने जिंकते. मित्रमैत्रिणींसोबत त्यांच्या पहिल्या सहलीची योजना आखत आहेत किंवा एकटे प्रवास करत आहेत त्यांनी मनालीला भेट दिली पाहिजे आणि आयुष्यभराचा सुंदर अनुभव घेतला पाहिजे.

जैसलमेर शहराचं सौंदर्य देखील फार सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारं आहे. जैसलमेर हे राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. भव्य किल्ले, वाळवंट आणि मंदिरांकडे आकर्षित करते. तुम्हाला महान शासकांच्या काही भव्य वाड्यांमध्ये देखील फिरता येईल. कुटुंबासोबत फिरण्यासाठी जैसलमेर उत्तम ठिकाण आहे.

Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.