MS Dhoni Diet: काय आहे धोनीचे फिटनेस सिक्रेट, पाहा कसा ठेवतो स्वत:ला फीट
फिटनेस चांगली असण्यासाठी तसा डाएट देखील असला पाहिजे. चांगला डाएट असला की फिटनेस चांगली राहते. मैदानावर ज्याचा फिटनेस चांगला त्यालाच चांगली खेळी खेळता येते. फिटनेस चांगला नसेल तर तो जास्त वेळ टिकू शकत नाही. त्यामुळे चांगल्या फिटनेससाठी कसा असावा डाएट जाणून घ्या.
Healthy Diet : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. विराट कोहली देखील धोनीचा फिटनेस पाहून इम्प्रेस झाला आणि तो ही त्याच्या फिटनेसकडे आता अधिक लक्ष देतो. धोनीचा प्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉट्स मारण्यासाठी जितकी ताकद लागते ती फक्त चांगल्या डाएटमुळेच येऊ शकते. डाएट हे फिटनेसचं रहस्ये आहे. ही गोष्ट आपण आपल्या या माजी भारतीय कर्णधाराकडून शिकू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कॅप्टन कूलचे फिटनेस सिक्रेट.
चरबीयुक्त अन्नाला नाही म्हणा
धोनी आपल्या शरीरातील सर्व अतिरिक्त चरबी कमी करण्यावर भर देतो. यासाठी तो आहाराचे काटेकोरपणे पालन करतो. अधिक चरबीयुक्त जेवण तो टाळतो. त्यानुसारच तो त्याच्या आहाराचे नियोजन करतो.
प्रोटीन शेक
प्रोटीन शेक हा आरोग्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. धोनी वर्कआउट करताना भरपूर प्रोटीन ड्रिंक्सही पितो. तुम्हालाही तुमचा फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही देखील वर्कआउट करताना रुटीनमध्ये प्रोटीन ड्रिंकचा समावेश करा.
ताजा ज्युस
धोनी सोडा आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळतो. त्याऐवजी तो ताजा ज्युस पितो. फळे आणि भाज्यांमधून सर्व पोषक तत्वे शोषून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एक ग्लास ताजा ज्युस पिणे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ताज्या ज्युसचा समावेश करू शकता. बंद पाकिटातले ज्यूस पिणे टाळले पाहिजे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
धोनी लहानपणापासूनच दूधप्रेमी आहे. त्याला अजूनही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आवडतात. दुग्धजन्य पदार्थ त्याच्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्था व्हिटॅमिन डी 3, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात.
नियमित व्यायाम
धोनी चांगल्या फिटनेसाठी खूप व्यायाम करतो. धोनी जेव्हा रन घेण्यासाठी पळतो तेव्हा त्याचा फिटनेस सगळ्यांनीच पाहिला आहे. यासाठी धोनी निरोगी आहाराचे पालन करतो.