AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधार कार्डप्रमाणेच असेल तुमचे नवे ‘हेल्थ कार्ड’, जाणून घ्या त्या संबंधित महत्त्वाच्या 10 प्रश्नांची उत्तरे…

ऑनलाईन स्तरावर लोकांशी संपर्क साधून, विविध सुविधा निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याने त्याला ‘डिजिटल हेल्थ मिशन’, असे नाव देण्यात आले आहे.

आधार कार्डप्रमाणेच असेल तुमचे नवे ‘हेल्थ कार्ड’, जाणून घ्या त्या संबंधित महत्त्वाच्या 10 प्रश्नांची उत्तरे...
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 1:18 PM

मुंबई : भारत सरकारने ‘डिजिटल इंडिया’ योजनेंतर्गत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले आहे. लोकांमध्ये आरोग्य क्षेत्रासंबंधित जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना आरोग्य अभियानात जोडणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासह देशातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर सरकारला करणार आहे. ऑनलाईन स्तरावर लोकांशी संपर्क साधून, विविध सुविधा निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ऑनलाईन राबवण्यात येणार असल्याने त्याला ‘डिजिटल हेल्थ मिशन’, असे नाव देण्यात आले आहे (National digital health mission have unique health id like aadhaar know facts and answers).

चला या ‘डिजिटल हेल्थ मिशन’संबंधी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…

  1. राष्ट्रीय ‘डिजिटल हेल्थ मिशन’ कधीपासून सुरू झाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी ‘डिजिटल हेल्थ मिशन’ सुरू केले. वर्ष 2018 मध्ये, एनआयटीआय आयोगाने डिजिटल हेल्थ मिशनसारख्या योजना सुरू करण्याची शिफारस केली होती, जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या डेटासाठी यंत्रणा तयार केली जाऊ शकेल.

  1. राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशनचा हेतू काय आहे?

या योजनेंतर्गत जनतेला आरोग्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची सरकारची योजना आहे. यासाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर सरकार करणार आहे. या दिशेने काम करण्यासाठी सरकार अ‍ॅपही तयार करत आहे. या अभियानांतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य आयडी असेल (National digital health mission have unique health id like aadhaar know facts and answers).

  1. आरोग्य आयडी म्हणजे काय? हे कसे कार्य करेल?

डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत, सरकार प्रत्येक व्यक्तीचा एक युनिक आयडी तयार करेल. या आयडीसह त्या व्यक्तीच्या वैद्यकीय रेकॉर्डचा बॅकअप तयार केला जाईल. या आयडीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय नोंदी पाहिल्या जाऊ शकतात. जर ती व्यक्ती डॉक्टरांकडे गेली तर, ते त्याचा हा आयडी तपासतील. यामुळे यापूर्वी त्या रुग्णावर कोणते उपचार केले गेले, कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि कोणत्या प्रकारची औषधे दिली गेली आहेत, हे समजेल.

  1. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण काय आहे आणि हे आरोग्य अभियानाशी कसे जोडले गेले आहे?

नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी (एनएचए) राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनचा एक भाग आहे. हेल्थ आयडी तयार करण्यात एनएचएची भूमिका महत्त्वाची असेल. एनएचए एखाद्या व्यक्तीची सर्व प्रक्रिया लिहून देईल, ज्याचे हेल्थ कार्ड तयार केले जाईल. जसे की, त्याच्या आरोग्याच्या नोंदी डिजिटल स्वरूपात गोळा करणे. आरोग्य आयडी तयार करण्यापूर्वी आरोग्य नोंदी डिजिटल स्वरुपात सादर करण्याचा आदेश एनएचएद्वारे देण्यात येईल.

  1. हेल्थ कार्डमध्ये काय प्रविष्ट केले जाईल?

ज्याचा हेल्थ आयडी तयार करायचा आहे, त्याचा मोबाइल व आधार नंबर घेतला जाईल. या दोन नंबरच्या आधारे हेल्थ आयडी तयार केला जाईल. म्हणूनच या दोन नंबरच्या आधारे तयार केलेली आयडी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा आणि महत्त्वाचा असेल. आपल्या आरोग्याच्या नोंदी हेल्थ आयडीशी जोडल्या जातील की नाही, हे ज्याचा आयडी तयार करायचा आहे त्या व्यक्तीकडून निश्चित केले जाईल (National digital health mission have unique health id like aadhaar know facts and answers).

  1. एखाद्याला हेल्थ आयडी कसा मिळेल?

सार्वजनिक रुग्णालय, सामुदायिक आरोग्य केंद्र, हेल्थ आणि वेलनेस केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य पायाभूत सुविधा नोंदणीशी संबंधित आरोग्यसेवा प्रदाता एखाद्या व्यक्तीची हेल्थ आयडी तयार करू शकतात. आपण आपल्या स्वत:च्या नोंदी https://healthid.ndhm.gov.in/register वर नोंदवून आपला हेल्थ आयडी तयार करू शकता.

  1. हेल्थ आयडीशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी कुठे संपर्क साधावा?

हेल्थ आयडीच्या नोंदणीशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी आपण ndhm@nha.gov.in ला भेट देऊ शकता किंवा 1800-11-4477 / 14477 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

  1. कोरोना काळातील डिजिटल हेल्थ मिशनद्वारे काय प्रदान केले जाऊ शकते?

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य सुविधा सुधारण्याचे ठरविले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकार या परिस्थितीत वेगाने काम करत आहे. या योजनेतून लोकांना आरोग्य सुविधा सहज मिळू शकतात असे, सरकारचे म्हणणे आहे (National digital health mission have unique health id like aadhaar know facts and answers).

  1. 18 वर्षाखालील मुलास हेल्थ आयडी बनवता येईल का?

होय, 18 वर्षाखालील मुलांचा हेल्थ आयडी तयार केला जाऊ शकतो. यामध्ये आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर आवश्यक असेल. आयडी तयार करण्याची प्रक्रिया प्रत्येकासाठी समान आहे. आयडी तयार करण्यासाठी नवजात मुलाची नोंदणी देखील केली जाऊ शकते. यासाठी कुलसचिव अर्थात रजिस्ट्रर कार्यालयाकडून जन्म प्रमाणपत्र आवश्यक असेल.

  1. हेल्थ आयडीसाठी कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे का?

नाही, ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. या मोहिमेमध्ये पेपरलेस काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. हेल्थ आयडी देताना किंवा नंतर डॉक्टर किंवा रुग्णालयात कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही.

(National digital health mission have unique health id like aadhaar know facts and answers)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.