AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतरांसाठी कधीही तुमच्या 8 सवयी बदलू नका, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला

बऱ्याच वेळा लोकं तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या सवयी बदलायला सांगतात. पण तुम्ही तुमच्या स्वत:ची ओळख म्हणजे तुमच्या सवयी विचारसरणी आणि आवड. तुम्ही कधीही समाजाच्या व इतरांच्या दबावाखाली येऊन सवयी बदलू नका. फॅशन, करिअर, संगीत, खाणं तसेच तुमचे स्वप्नं ही तुमची वैयक्तिक निवड असते. स्वत:वर प्रेम करा. त्यामुळे तुम्ही इतरांसाठी कधीही तुमच्या या सवयी बदलू नका.

इतरांसाठी कधीही तुमच्या 8 सवयी बदलू नका, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला
Self loveImage Credit source: Tv9 Bharatvarsh
Follow us
| Updated on: Mar 15, 2025 | 4:15 PM

प्रत्येक व्यक्तीची ओळख त्यांच्या आवडी-निवडी तसेच त्यांच्या विचारसरणीतून तयार होत असते. पण कधी कधी लोकं, समाज, कुटुंब आणि मित्रांच्या सांगण्यावरून स्वत:ला बदलायला लागतात, त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या सवयी बदलू नयेत. अनेकदा लोकं आपल्याला बदलण्याचा प्रयत्न करतात. तर कधी त्यांच्या आवडीनुसार तर कधी समाजातील लोकांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे आपण स्वत:चे व्यक्तीमत्व विसरून जातो. अशा परिस्थितीत, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा जेव्हा आपण इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतःपासुन हरवून जातो, आपण आपलाच विचार करत नाही.

त्यामुळे तुम्हालाच ठरवायचे आहे की स्वतःला आनंदी ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे की जगाला आनंदी ठेवणे? कारण जर तुम्ही इतरांच्या अपेक्षांनुसार स्वतःला बदलत राहिलात तर एक दिवस तुम्ही स्वत:ची ओळख विसरून जाल. म्हणून कोणी काहीही म्हटले तरी इतरांसाठी या 8 सवयी कधीही बदलू नका. कोणत्या आहेत त्या सवयी चला जाणून घेऊयात…

8 सवयी ज्या तुम्ही कधीही कोणासाठीही बदलू नयेत

1. तुमच्या प्रायोरिटीजला पहिले प्राधान्य द्‌या

तुम्ही जर इतरांपेक्षा तुमच्या गरजांना जास्त महत्त्व देता तेव्हा इतर लोकं तुम्हाला स्वार्थी म्हणतील, पण लक्षात ठेवा, स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे स्वार्थ नाही तर स्वतःवर प्रेम करणे होय. जर तुम्ही तुमच्या आनंदाकडे आणि गरजांकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही हळूहळू आतून मनातुन पोकळ व्हाल.

इतरांना मदत करा, पण स्वतःला मागे ठेवू नका.

2. तुमची स्वप्ने आणि आवड सोडू नका

“एवढ्या मोठ्या वयात तू नवीन करिअर सुरू करशील का?”

“यात पैसे नाहीत, दुसरे काहीतरी शोध!”

तुम्ही सुद्धा तुमच्या नातेवाईकांकडुन व समाजातील इतर व्यक्तींकडुन या गोष्टी ऐकल्या असतील, पण प्रश्न असा आहे की – तुम्हाला तुमचे आयुष्य इतरांनुसार जगायचे आहे का? जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर ती आवड जपा. तुमचे स्वप्न पुर्ण करा. कारण तुम्ही जर इतरांच्या म्हणण्यानुसार ऐकत राहिलात तर एक दिवस तुम्ही स्वत:ला दोष देत रहाल.

तुमच्या स्वप्नांची कदर करा, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल.

3. ‘नाही’ म्हणायला शिका

प्रत्येक समाजात अशी काही लोकं असतात त्यांना वाटतं तुम्ही त्यांच ऐकावे. त्या लोकंसाठी वेळ काढावा. त्यांचे ऐकावे, आणि त्यांच्या इच्छेनुसार वागावे. पण ती व्यक्ती तुमच्यासाठीही असेच करते का?

जर नाही, तर ‘नाही’ म्हणण्यात एवढा संकोच कधीच करू नका. सरळ नाही म्हणायला शिका.

– प्रत्येक गोष्टीला ‘हो’ म्हणणे आवश्यक नाही, तुमच्या मर्यादा निश्चित करा.

4. तुमच्या नैतिक मूल्यांशी तडजोड करू नका

कधीकधी परिस्थिती तुम्हाला खोटे बोलण्यास, फसवणूक करण्यास किंवा चुकीच्या गोष्टी करण्यास भाग पाडू शकते, परंतु एकदा तुम्ही तुमच्या मूल्यांशी तडजोड केली की, पुन्हा स्वतःकडे पाहणे कठीण होईल.

संपूर्ण जग तुमच्या विरोधात असले तरीही, जे बरोबर आहे त्यासाठी उभे राहा!

5. मानसिकदृष्ट्या जागरूक राहा

जर एखादी गोष्ट, काही नातेसंबंध किंवा एखादी व्यक्ती तुमची मानसिक शांती नष्ट करत असेल तर त्यापासून दूर राहणेच चांगले हे लक्षात ठेवा.

लोक म्हणतील “इतकी काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल!” पण जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर काय उपयोग?

नकारात्मक गोष्टी आणि लोकांपासून स्वतःचे रक्षण करा, तुमच्या आनंदाला महत्त्व द्या!

6. वैयक्तिक जागेबाबत तडजोड करू नका

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गोपनीयतेचा आणि स्वत:साठी एकांतात वेळ घालवण्याचा अधिकार आहे.

जर कोणी तुम्हाला असे वागा तसे करा असे उपदेश देत तुम्हाला सांगत असतील तसेच तुमच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करत असेल, तर हे योग्य नाही.

– वैयक्तिक जागेचा आदर करा, इतरांना सांगा की तुमचे जीवन तुमच्या पद्धतीने चालणार आहे.

7. तुमचा दयाळूपणा आणि साधेपणा गमावू नका

जग तुम्हाला सांगेल- “जास्त चांगले वागू नकोस, लोक फायदा घेतील!”

पण तुम्ही त्यांच्यासारखे व्हावे का?

जर तुम्ही इतरांप्रती नम्र, दयाळू आणि प्रामाणिक असाल तर ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जग कसेही असो, तुम्ही तुमचा चांगुलपणा टिकवून ठेवला पाहिजे.

– जग बदलू शकते, पण तुमची माणुसकी सोडू नका.

8. स्वतःची ओळख जपा

जर लोक तुम्हाला म्हणाले की “असे वागू नकोस, असे बोलू नकोस, असे विचारू नकोस”, तर समजून घ्या की ते तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारू शकत नाहीत.

जर तुम्ही स्वतःला बदलत राहिलात तर एक दिवस तुम्ही स्वतःला ओळखूही शकणार नाही.

जगापासून वेगळे राहणे, आपली ओळख टिकवणे चुकीचे नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.