AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? ‘या’ पदार्थांसाठी आहे ‘No Entry’

धावपळीच्या जगात मायक्रोवेव्ह म्हणजे जादूची छडीच! बटण दाबलं की मिनिटात जेवण गरम! पण थांबा... तुम्ही पण काहीही उचलून थेट मायक्रोवेव्हमध्ये गरम करता का? ही सवय तुमच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकते. सोयीस्कर वाटणारं हे उपकरण वापरताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही, तर अनपेक्षित नुकसान होऊ शकतं. चला, जाणून घेऊया अशा कोणत्या ३ गोष्टी आहेत ज्यांना मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करणं टाळायलाच हवं!

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताय? ‘या’ पदार्थांसाठी आहे ‘No Entry’
ही काळजी घ्याImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Apr 15, 2025 | 2:53 PM

आजच्या दैनंदिन जीवनात मायक्रोवेव्ह हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. गॅसच्या तुलनेत तो चुटकीत जेवन गरम करतो, पण हाच मायक्रोवेव्ह तुमच्या आरोग्यासाठी कधी कधी धोकादायक ठरू शकतो, हे माहित आहे का?होय, मायक्रोवेव्हमध्ये काही अन्नपदार्थ पुन्हा गरम करणं तुमच्यासाठी हानिकारक असू शकतं. काही पदार्थांच्या रचनेत गरम करताना बदल होतात, जे शरीरासाठी अपायकारक  ठरतात. चला जाणून घेऊया अशा ३ गोष्टी, ज्या मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करणं टाळावं!

मांस व चिकन (Meat & Poultry)

अनेक वेळा उरलेलं चिकन, मटण किंवा तत्सम पदार्थ पटकन मायक्रोवेव्हमध्ये गरम केले जातात. पण मायक्रोवेव्हमध्ये अन्न समान तापमानाने गरम होत नाही. मांसाच्या बाहेरील भाग गरम होतो, पण आतील भाग नीट गरम होत नाही. अशा वेळी त्यात असलेले जीवाणू जसे की Salmonella नष्ट होत नाहीत आणि फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. याशिवाय मांसाचे प्रोटीन गरम करताना बदलते, जे पचनासाठी त्रासदायक ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

सल्ला : मांस पुन्हा गरम करताना गॅसवर मंद आचेवर व्यवस्थित तापवणं जास्त सुरक्षित आहे.

अंडी (Boiled & Cooked Eggs)

शिजवलेली अंडी मायक्रोवेव्हमध्ये गरम करणं म्हणजे धोक्याचा सिग्नल! अंड्याच्या आत वाफ साचते आणि दाबामुळे अंडं फाटून उडू शकतं. यामुळे तुमच्या चेहऱ्याला किंवा हाताला इजा होण्याचा धोका असतो. तसेच, ऑम्लेट, भुर्जी किंवा इतर अंडीचे पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यावर चिवट आणि रबरासारखे होतात, ज्यामुळे ते खाण्याची मजा बिघडते.

सल्ला : अंडी ताजीच शिजवून खाणं उत्तम! गरम करायचं असल्यास, तवा किंवा पॅनवर हळुवार तापवावं.

हिरव्या पालेभाज्या (Leafy Greens)

पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात. मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करताना या नायट्रेट्सचं रूपांतर Nitrosamines नावाच्या घातक घटकात होऊ शकतं, जे दीर्घकाळ शरीरात राहिल्यास कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतात.

सल्ला : पालेभाज्या ताज्या असतानाच खाणं उत्तम! उरलेल्याच खायच्या असतील, तर थंडच खाव्यात किंवा गरम करण्याऐवजी तापमानावर आणूनच सेवन कराव्यात.

मायक्रोवेव्ह वापरणं खरोखरच सोयीचं आहे, पण काही गोष्टी त्यात गरम करताना सावध राहणं हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.