पत्नीने चुकूनही कुणाला सांगू नये ‘या’ 3 गोष्टी, नाही तर त्याचं…

चाणक्य नीतीनुसार, पती-पत्नीने आपल्या वैवाहिक जीवनातील काही गोष्टी सार्वजनिकपणे शेअर करू नयेत. यामध्ये वैयक्तिक मतभेद, शारीरिक समस्या आणि आर्थिक स्थितीचा समावेश आहे. या गोष्टी सार्वजनिक करणे नात्याला हानी पोहोचवू शकते आणि बाहेरच्या व्यक्तींना तुमच्या नात्यात हस्तक्षेप करण्याची संधी मिळू शकते. आपल्या वैवाहिक जीवनातील विश्वास आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी हे गुपिते राखणे आवश्यक आहे.

पत्नीने चुकूनही कुणाला सांगू नये 'या' 3 गोष्टी, नाही तर त्याचं...
husband wife secrets chankya nitiImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 2:55 PM

कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचं वैवाहिक जीवन सर्वात महत्त्वाचं असतं. त्याच्या गृहस्थी जीवनाची गाडीच त्यावर टिकलेली असते. नातं म्हटलं तर त्यात प्रेम, गोडवा, रुसवा हा आलाच. पती-पत्नीचं नातंच असंच असतं. आर्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पती-पत्नीच्या नात्याची मजबूती आणि मर्यादा कायम राखण्यासाठी, पत्नीने कधीही तिच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित काही गोष्टी सार्वजनिकपणे कधीही शेअर करू नयेत, असं म्हटलं आहे. चला, तर मग जाणून घेऊया, त्या गोष्टी कोणत्या आहेत.

वैयक्तिक नातेसंबंध शेअर करू नका

पती-पत्नीच्या नात्यात कधी प्रेम असते, तर कधी तणाव. दोघांनी मिळून गृहस्थीचा गाडा चालवायचा असतो. त्यामुळे कधी ना कधी मतभेद होऊ शकतात. परंतु या सर्व गोष्टी पती-पत्नीच्या खास गोष्टी असतात आणि त्या सार्वजनिकपणे कोणासमोर आणता कामा नये. आपलं नातं चांगलं आहे की वाईट? हे दुसऱ्यांना सांगायचं टाळा. चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीच्या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असतात, त्या दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने नात्यात नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

शारीरिक समस्यांचा उल्लेख टाळा

चाणक्य नीतीनुसार, बायकोने कधीही आपल्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांचा इतरांसमोर उल्लेख करू नये. चाणक्य म्हणतात, जी स्त्री तिच्या नवऱ्याच्या शारीरिक समस्यांची चर्चा इतरांसमोर करते, तिला फक्त कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कोणताही दुसरा व्यक्ती तुमच्या समस्यांचं निवारण करणार नाही. उलट तुमच्या पाठीमागे तुमची खिल्ली उडवेल. तसेच, तुमच्या पडत्या बाजूही उघड होतील, ज्यामुळे तुमच्या नात्यात फूट पडू शकते.

आर्थिक स्थिती

चाणक्य यांच्या मते, पती-पत्नीने मिळूनच गृहस्थी चालवायला हवी असते. यासाठी कोणीही मदत करत नाही. त्यामुळे पत्नीने कधीही आपल्या नवऱ्याच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख इतरांसमोर करू नये. तुमच्या घरी पैसे भरपूर असले तरी किंवा तुम्ही आर्थिक अडचणीत असलात तरीही या बाबींचा उल्लेख इतरांसमोर करू नका. याशिवाय, नवऱ्याच्या उत्पन्नाची स्थिती किंवा त्याची कमाई कशी आहे, याबद्दल माहिती इतरांसोबत शेअर करणे टाळा.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.