AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वरून Call करायला आता App उघडायची गरज नाही? आलंय ‘हे’ नवीन Feature!

व्हॉट्सअ‍ॅपने iPhone यूझर्ससाठी नवीन कॉलिंग फीचर आणलं आहे! आता तुम्ही तुमच्या फोनच्या डायलरमधून थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता, आणि प्रत्येक वेळी व्हॉट्सअ‍ॅप उघडण्याची गरज नाही. पण, Android यूझर्सना यासाठी अजून थोडं थांबावं लागणार आहे. हे फीचर सेट करण्यासाठी तुमचं iPhone अपडेट करा आणि व्हॉट्सअ‍ॅपला डिफॉल्ट कॉलिंग अ‍ॅप म्हणून निवडा. जाणून घ्या, कसं होईल तुमचं कॉलिंग अनुभव अधिक सोप्पं!

WhatsApp वरून Call करायला आता App उघडायची गरज नाही? आलंय ‘हे’ नवीन Feature!
व्हॉट्सअप कॉलImage Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 24, 2025 | 9:40 AM

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कार्यालयीन काम, आणि व्यक्तिगत संवाद ईत्यादी कामांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर प्रत्येकाने करायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणि सुविधा आणत राहतो, ज्यामुळे वापर करणे सोपे आणि अधिक आरामदायक होते. आता, व्हॉट्सअ‍ॅपने आणले आहे एक नवीन कॉलिंग फीचर, ज्यामुळे कॉल करणे आणखी सोपे आणि सहज होईल.

परंतू, सध्या हे फीचर सर्व Android फोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. हे फीचर केवळ iPhone आणि iOS वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध आहे, त्यामुळे Android यूझर्सला अजून थोडा वेळ वाट पाहावा लागेल.

तुम्हाला विचार येईल की, या नवीन फीचरमध्ये काय विशेष आहे? साधारणपणे व्हॉट्सअ‍ॅपवर कॉल करण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप उघडून कॉन्टॅक्ट शोधावा लागतो आणि मग कॉल करावा लागतो. पण या नवीन फीचरमुळे आयफोन वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपला ‘डिफॉल्ट कॉलिंग अ‍ॅप’ म्हणून सेट करण्याची सुविधा मिळाली आहे. याचा फायदा असा की, आता तुम्ही तुमच्या फोनच्या डायलरमधून थेट व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप उघडून, कॉन्टॅक्ट शोधण्याची गरज नाही.

हे नवीन फीचर सेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या iPhoneच्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Default Apps’ पर्याय शोधावा लागेल. त्यानंतर ‘Calling’ किंवा संबंधित पर्याय निवडून व्हॉट्सअ‍ॅपला डिफॉल्ट कॉलिंग अ‍ॅप म्हणून सेट करा. यामुळे तुम्ही थेट डायलरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता.

सध्या हे फीचर फक्त iPhone वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, पण लवकरच Android फोनसाठीही हे फीचर येईल. त्यामुळे, भविष्यात तुमचं कॉलिंग अनुभव अधिक सोप्पं आणि सुविधाजनक होईल.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....