घरच्या घरी लिप स्क्रब बनवण्याची पद्धत, ओठांचा कोरडेपणा होतो दूर!
ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुम्हाला अनेक फायदे देतात. पण तुम्हाला माहित आहे का की ओट्स तुमच्या त्वचेला खूप फायदा देऊ शकतात. नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी लिप स्क्रब घेऊन आलो आहोत. ओट्स त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतात.
मुंबई: ओट्स हे एक धान्य आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ओट्स ग्लूटेन फ्री असतात. त्यामुळे वजन कमी करताना लोक आपल्या आहारात ओट्सचा समावेश नक्कीच करतात. याशिवाय ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुम्हाला अनेक फायदे देतात. पण तुम्हाला माहित आहे का की ओट्स तुमच्या त्वचेला खूप फायदा देऊ शकतात. नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी लिप स्क्रब घेऊन आलो आहोत. ओट्स त्वचेला एक्सफोलिएट करण्यास मदत करतात. यासोबतच ओट्स तुमच्या त्वचेवरील डेड स्किन काढून टाकतात, ज्यामुळे तुम्हाला टॅनिंगच्या समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच यामुळे ओठ कोरडे पडण्याची समस्याही दूर होते, तर चला जाणून घेऊया ओट्स लिप स्क्रब कसे बनवावे…
ओट्स लिप स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- मध 1 टीस्पून
- ओट्स पाउडर 1 टीस्पून
ओट्स लिप स्क्रब कसे बनवावे?
- ओट्स लिप स्क्रब बनविण्यासाठी, प्रथम एक वाटी घ्या.
- नंतर त्यात मध आणि ओट्स पावडर घालून चांगले मिक्स करा.
- आता तुमचे ओट्स लिप स्क्रब तयार आहे.
ओट्स लिप स्क्रब कसे वापरावे?
- ओट्स लिप स्क्रब घ्या आणि आपल्या ओठांवर चांगले लावा.
- त्यानंतर सुमारे 2 मिनिटे ओठ स्क्रब करा.
- यानंतर स्क्रब ओठांवर लावा आणि 10 मिनिटे ठेवा.
- त्यानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्यावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)