केस मुलायम आणि चमकदार हवेत?, मग, ऑलिव्ह ऑईलचा अशाप्रकारे करा वापर

केसांच्या आरोग्यासाठी नियमितपणे त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे.

केस मुलायम आणि चमकदार हवेत?, मग, ऑलिव्ह ऑईलचा अशाप्रकारे करा वापर
पार्लरमध्ये जाऊन केस स्ट्रेट करण्यासाठी महिला बरेच पैसे घालतात. मात्र, आज आम्ही काही घरगुती टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे केस स्ट्रेट होतील. केस स्ट्रेट पॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक कप दूध आणि एक अंड लागणार आहे. एक कप दुधात अंडी मिक्स करा आणि हा पॅक ब्रशने केसांवर लावा. अर्ध्या तासांसाठी पॅक केसांवर ठेवा आणि त्यानंतर फक्त शैम्पूने आपले केस धुवा. हा पॅक लावल्याने केस स्ट्रेट होतील.
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 11:45 AM

मुंबई : केसांच्या आरोग्यासाठी नियमितपणे त्यांना तेलाने मसाज करणे आवश्यक आहे. परंतु, जेव्हा आपण आपल्या केसांसाठी योग्य तेलाची निवड करता, केवळ तेव्हाच केसांची योग्य वाढ होणे शक्य असते. बाजारात अनेक प्रकारची तेल उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणतेही तेल जाहिरात पाहून वापरण्यास सुरूवात करतो आणि काही फायदा होत नसल्यास आपण ते त्वरित बदलतो. या प्रकारचा प्रयोग केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरत नाही तर आणखी हानिकारक ठरू शकतो. (Olive oil is beneficial for hair)

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी जर आपले केस खूप कोरडे होत असतील तर अंडी आणि ऑलिव्ह तेलाची केसांसाठी पेस्ट बनवा. कोरड्या केसांसाठी आपण अंडीचा फक्त पिवळा भाग वापरावा. हे पर्यायी आहे, आपण इच्छित असल्यास आपण पांढरा भाग देखील वापरू शकता. त्यात चरबी आणि प्रथिने असतात. ज्यामुळे केसांना मॉइस्चराइज होते. ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला अंडीमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळावे लागेल. पेस्ट तयार झाल्यानंतर, 30 मिनिटांसाठी डोक्यावर ठेवा. त्यानंतर शैम्पू करा

केस चमकदार करण्यासाठी केसांची चमक कायम राखण्यासाठी, आपण अर्ध्या चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये दोन चमचे नारळ तेल घालावे. सुमारे 10 ते 15 मिनिटे या तेलाने आपल्या डोक्यावर मसाज करा. अर्ध्या तासानंतर ते कोमट पाण्याने केस धुवा. यामुळे आपल्या केसांमध्ये ओलावा राहील. हे आपले केस मजबूत करण्यास देखील मदत करेल. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हे करू शकता.

कोंडा काढून टाकण्यासाठी बहुतेक लोकांना डोक्यातील कोंडाची समस्या असते. ते काढण्यासाठी आपण ऑलिव्ह ऑईल मास्क देखील वापरू शकता. यासाठी, आपल्याला ऑलिव्ह ऑईल आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात घेऊन पेस्ट बनवावी लागेल. ही पेस्ट बोटाने केसांच्या मुळांवर हळू हळू लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 5 मिनिटे असे केल्यावर शैम्पू आणि कंडिशनर वापरा.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Olive oil is beneficial for hair)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.