श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न काही निवडक लोकांसाठीच खरे ठरते. काही लोक मेहनतीने श्रीमंत होतात तर काही लोक नशिबाच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात (Make a lot of money). त्याच वेळी, काहीजण अगदी कमी वयात श्रीमंत (Rich at a young age) होतात, तर काही म्हातारे झाल्यावर पैशात खेळतात. आज आम्ही तुम्हाला अशा मुलाची ओळख करून देणार आहोत ज्याने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हा मुलगा आज, आलिशान बंगल्यात राहतो. लक्झरी कारने प्रवास करतो. महागड्या हॉटेलमध्ये आलिशान जीवन (Luxurious life) जगतो. त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. इतकंच नाही तर तो दर महिन्याला जवळपास 16 लाख रुपये कमावतो. कोण आहे हा मुलगा..? त्याचे नेमके काम काय आहे? इतक्या लहान वयात श्रीमंत कसा झालास? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
या पंधरा वर्षाच्या श्रीमंत मुलाचे नाव डोनाल्ड डॉगर आहे. डोनाल्ड 15 वर्षांचा असून तो अमेरिकेत राहतो. त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, डोनाल्ड दरमहा 16 लाख रुपये (17,000 डॉलर) पर्यंत कमावतो. तो सध्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत मुलांच्या यादीत 19 व्या क्रमांकावर आहे. डोनाल्ड डॉगर सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून पैसे कमवित आहे. त्याचे स्वतःचे YouTube चॅनल आहे. सुमारे 6 लाख लोकांनी त्याला फॉलो केले. यासोबतच त्याने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओही पोस्ट केले आहेत. सोशल मिडीयावर मिळणाऱया जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून तो लाखो रुपये कमावतो आहे.
डोनाल्ड 2019 पासून व्हिडिओ बनवत आहे. त्याच्याकडे एक आलिशान बंगला आणि अनेक आलिशान गाड्या आहेत. परंतु, यू.एस. ड्रायव्हिंग कायद्यामुळे तो वयाच्या 15 व्या वर्षी गाडी चालवू शकत नाही. त्याच्याकडे मॅक्लारेन, ऑडी आणि बुगाटी सारख्या सुपरकार आहेत. या आलिशान गाड्यांचे व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
डोनाल्ड किती ग्लॅमरस जगतात याचा अंदाज तुम्ही त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट पाहून लावू शकता. त्यांचे एक आलिशान लाकडापासून तयार केलेले घर होते. ज्याची किंमत फक्त 8.54 कोटी रुपये होती. परंतु चुकीच्या ठिकाणी ताडाची झाडे लावल्याने पुरात त्याच्या घराची फरशी वाहून गेल्याने, त्याला 45 कोटी रुपयांचे घर सोडावे लागले. त्यानंतर तो नवीन घरात राहू लागला.