सावधान! रक्तदाब-जळजळ-उष्णता, काढ्याच्या अति सेवनाने होतील आरोग्यावर दुष्परिणाम!
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, या उक्ती प्रमाणे काढ्याचे अतिसेवनही आरोग्यासाठी लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकते.
मुंबई : कोरोना कालावधीत लोकांमध्ये वेगवेगळे काढे सेवन करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी, काही लोक दिवसांतून कित्येक वेळा काढ्याचे सेवन करत होते. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, या उक्ती प्रमाणे काढ्याचे अतिसेवनही आरोग्यासाठी लाभदायी ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जाणार्या काढ्यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो (Over does of Kadha can be harmful for health).
कोरोनाच्या माहामारी काळात लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. थंड वातावरणात अनेकांना साधा ताप, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे लोक आजारी पडायला फार घाबरत आहेत. सुरूवातीची कोरोनाची लक्षणे ही सामान्य फ्लू प्रमाणे असल्याकारणाने कोरोनाचे संक्रमण झालेय का, अशी धास्ती लोकांना वाटते. यामुळेच लोक रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी काढ्याचे सेवन करत आहेत.
काफा-वात-पित्ताच्या प्रकृतीनुसार काढ्याचे प्रमाण :
आयुर्वेदात सर्व रोगांचा उपचार कफ, वात आणि पित्ताच्या प्रकृतीनुसार केला जातो. तज्ज्ञांच्या मते, काढा हा कफ प्रकृतीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, पित्त आणि वात दोष असलेल्या लोकांनी कोणत्याही तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय काढा पिऊ नये. पित्त दोष असलेल्या लोकांनी काळी मिरी, दालचिनी आणि सुंठ यांचा फार कमी वापर करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, त्यांना अॅसिडीटी होण्याचा धोका असतो.
शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
तज्ज्ञांच्या मते जेव्हा जेव्हा आपण काढा प्याल, तेव्हा शरीरातील बदलांकडे लक्ष द्या. जर आपल्याला आंबट ढेकर, अॅसिडीटी किंवा मूत्रासंबंधित काही समस्या वाटत असेल तर या काढ्याचे सेवन कमी करा अथवा यातील सामग्रीचे प्रमाण कमी करा (Over does of Kadha can be harmful for health).
‘या’ समस्या देऊ शकतात त्रास
– जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही काढा पिऊ नये. यामुळे नाकातून रक्तस्त्राव होऊ शकतो आणि आपण मोठ्या समस्येत अडकू शकाल.
– काढा उष्ण पदार्थांपासून बनवला जातो. याच्या अति सेवनामुळे तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, अॅसिडीटी, आंबट ढेकर, डोकेदुखी आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
– लघवी करताना मूत्र मार्गात जळजळ उद्भवू शकते. असे काही तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ सावधगिरी बाळगा. तसेच, काढ्याचे सेवन टाळा.
– काढ्यात मसाल्याच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता इंटरनेटवर पाहून घरी काढा तयार करत आहेत. पण त्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
– काळी मिरी दालचीनीच्या अतिसेवनाने पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.गुळवेळ, अश्वगंधा यांसारख्या औषधीं वनस्पतींच्या ओव्हरडोसमुळे शारीरिक समस्या उद्भवतात.
– काढ्याने शरीराला अनेक फायदे मिळत असले तरी अतिसेवनाचे दुष्परिणामही आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करा.
(Over does of Kadha can be harmful for health)
हेही वाचा :
भारताच्या चार राज्यात कोरोना लसीचे ‘ड्राय रन’, जाणून घ्या नेमकं काय होणार…https://t.co/Xza2pMJuM6#CoronaVaccine #DryRun
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020