सारखीच झोप येते का? या टिप्स फॉलो करून मिळवा Over Sleeping पासून सुटका
प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोकांना ही समस्या असते की रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर आळस जाणवतो. म्हणजेच 8 तास झोपल्यानंतरही त्यांना सतत झोप येते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना 10 ते 12 तास झोपल्यानंतरही थकवा किंवा झोप येत असेल तर तुम्हाला काही टिप्सचा अवलंब करावा लागेल.
मुंबई: निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पुरेशी झोप देखील व्यक्तीसाठी खूप महत्वाची आहे. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. पण काही लोकांना ही समस्या असते की रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर आळस जाणवतो. म्हणजेच 8 तास झोपल्यानंतरही त्यांना सतत झोप येते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना 10 ते 12 तास झोपल्यानंतरही थकवा किंवा झोप येत असेल तर तुम्हाला काही टिप्सचा अवलंब करावा लागेल. जास्त झोप येऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा.
सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की रात्री भरपूर झोप घेतल्यानंतरही दिवसभर झोप आणि आळस का येतो. याची अनेक कारणे असू शकतात. काही कामानिमित्त रात्री उशीरा झोपणे, 8 तास पुरेशी झोप न मिळणे, लवकर झोप न लागण्याची समस्या, जास्त ताण घेणे, चहा किंवा कॉफी जास्त पिणे, शारीरिक हालचाली न करणे इत्यादी. गोष्टींमुळे आळस येतो, दिवसभर झोप येते.
सतत झोप येऊ नये म्हणून या टिप्स फॉलो करा…
- आपली झोपण्याची वेळ सेट करा.
- खोलीत अंधारात झोपा आणि फॅन तुम्हाला हवं तितकं ठेवा.
- रात्री हलका आहार घ्या.
- रात्री कधीही उपाशी झोपू नका.
- रात्री झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक वाचा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)