आरोग्यवर्धक पपई अशाप्रकारे चेहऱ्याला लावा आणि मिळवा 10 मिनिटात पार्लरसारखा ग्लो
पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात.
मुंबई : पपई आरोग्यासाठी खूप चांगली आहे, हे सर्वांना ठावूक आहे. पपई नियमितपणे खाण्याने शरीराला बरेच फायदे होतात. बरेच लोक आपल्या आहारात नियमितपणे पपईचा समावेश करतात. पपईत खनिज, पोषक तत्व आणि व्हिटामिन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईमध्ये असलेले व्हिटामिन c, व्हिटामिन E आणि बीटा क्यारोटीनसारखे अँटी ऑक्सिडंट असतात. (Papaya is beneficial for the skin)
ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि व्हिटामिनमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. यामुळे आपण अधिक काळासाठी तरुण दिसू शकतो. पपईमध्ये उपलब्ध असलेले क्यारोटीन हे फुफ्फुस व तोंडाच्या कॅन्सरपासूनदेखील बचाव करते. आज आम्ही तुम्हाला पपईचा फेस पॅक सांगणार आहोत यामुळे तुमच्या त्वचेला काही मिनिटांमध्येच ग्लो येईल.
-पपईची एक फोड घ्या
-तीन चमचे गुलाब पाणी
-दोन चमचे मध
-दोन चिमूटभर हळद
सर्वप्रथम पपईची पेस्ट बनवा आणि त्यात गुलाब पाणी, मध आणि हळद मिसळा. बर्फाच्या ट्रेमध्ये तयार पेस्ट भरून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे आइस क्यूब्स आपल्या चेहऱ्याला लावा, मात्र, या आइस क्यूब्स चेहऱ्याला लावण्याचा अगोदर चेहरा स्वच्छ करून घ्या. हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावले तर चेहऱ्यावर ग्लो येईल.
पपईच्या बिया अँटीऑक्सिडेंट्सने समृद्ध असतात, म्हणून त्या शरीरातील रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. याच बरोबर आपल्या शरीराला सामान्य सर्दी, सौम्य खोकला, सर्दी या आजारांपासून दूर ठेवतात. यात जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपली पाचक तंत्र आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसेच, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर या बिया तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!https://t.co/5d5zna9tBx#diabetes #Sugar #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
(Papaya is beneficial for the skin)