Parenting tips: पालकांनी 2 वर्षाच्या मुलासमोर करू नये ‘या’ चुका, नंतर होईल पश्चाताप!

Parenting tips: मुलं निरागस असतात आणि आपण जे काही करतो, ते त्यातून शिकतात. पालक मुलांना जे सांगतात त्या मुलांचे कमी लक्ष असते. परंतु, पालक जे वागतात त्याचे हुबेहुब अनुकरण लहान मुलं करताना दिसतात. त्यामुळे पालकांची जबाबदारी आणखी वाढते. जाणून घ्या, लहान मुलांसमोर कोणत्या चुका करू नये.

Parenting tips: पालकांनी 2 वर्षाच्या मुलासमोर करू नये ‘या’ चुका, नंतर होईल पश्चाताप!
पालकांनी 2 वर्षाच्या मुलासमोर करू नये ‘या’ चुका
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:03 PM

सहसा, प्रत्येक पालक (Every parent) मुलाच्या जन्मापासून ते मुलं मोठे होईपर्यंत प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची काळजी घेतात. आपल्या पाल्याला चांगले पोषण आणि विकास मिळावा यासाठी पालक प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते सर्व प्रकारचे प्रयत्न करत असतात. पण संगोपन करताना पालक अशा काही चुका करतात, जे काही वेळा त्यांच्यासाठी नंतर पश्चाताप (Repentance) करण्यासारखे ठरू शकतात. जेव्हा मूल 2 वर्षांचे होते, तेव्हा ते पालकांच्या प्रत्येक क्रिया लक्षात घेतो आणि त्यांची कॉपी करू लागतो. आई-वडिलांनी काही चूक केली तर त्यालाही तीच वाईट सवय लागू शकते. बाहेरच्या व्यक्तीसमोर मुलाने या सवयी दाखविल्यावर परिस्थिती बिघडते आणि पालकांना लाज वाटावी (Shame on you) अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, पालकांनी अशा सवयी मुलांसमोर अंगिकारताना काळजी घ्यायला हवी.

जोरात ओरडू नये

आपल्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. काही घटना चांगले असतात तर, काही वाईटही असतात. या सगळ्यात आपण मोठी माणसं कधी कधी अशी वागणूक अंगीकारतो, ज्यामुळे आपल्यातील वाईट माणूस बाहेर येतो. आई-वडिलांमध्ये वाद झाला तर मुलासमोर एकमेकांवर ओरडण्याची चूक त्यांनी करू नये. कारणं मुलांना हे तुमचे वागणे चूकीचे आहे याची समज नसते. त्यामुळे तो कधीकधी इतरांवर त्याच प्रकारे ओरडतो आणि तेच शब्द वापरतो, जे तुम्ही रागाच्या भरात तोंडातून काढले होते. हे शब्द अपशब्द देखील असू शकतात, ज्यामुळे तुम्हाला इतरांसमोर लाज वाटू शकते.

एकमेकांना किस करणे

अनेक वेळा पालक त्यांच्या 2 वर्षाच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलासमोर किस करतात. हा जीवनाचा एक भाग आहे, परंतु मुलासमोर हे करणे कुठेतरी चूक असल्याचे सिद्ध होऊ शकते. तुमचे मूल तुमची ही चूक इतरांसमोर पुन्हा करू शकते त्यामुळे तुम्हाला त्या कृतीची लाज वाटेल.

हे सुद्धा वाचा

रागाने वस्तू फेकणे

काही पालक असे असतात ज्यांना रागाच्या भरात वस्तू फेकून देण्याची सवय असते. तुमची ही सवय तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलाचेही नुकसान करू शकते. अशी वृत्ती कधीही अंगीकारू नका आणि मुलासमोर ही चूक करण्याची चूक करू नका. तुम्हाला पाहून तुमचे मूल सामान्य परिस्थितीतही महागड्या वस्तू फेकून देऊ शकते. ज्यामुळे तुमचे भारी नुकसानही होऊ शकते किंवा मुलांना दुखापतही होऊ शकते.

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.