वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही देखील करताय का ‘या’ चुका? आरोग्याला होईल मोठे नुकसान!

वजन कमी करणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. परंतु, योग्य आहारासह, कसरत आणि मनाचा दृढ निश्चय यामुळे वजन कमी करणे सहज शक्य आहे. तथापि, बहुतेक लोक वजन कमी करताना सामान्य चुका करतात. ते एकतर लोकांमध्ये पसरलेल्या दंतकथा आणि गैरसमजांवर विश्वास ठेवतात किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या शब्दावर अवलंबून राहतात.

वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही देखील करताय का ‘या’ चुका? आरोग्याला होईल मोठे नुकसान!
वेट लॉस
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 5:48 PM

मुंबई : वजन कमी करणे ही एक अवघड प्रक्रिया आहे. परंतु, योग्य आहारासह, कसरत आणि मनाचा दृढ निश्चय यामुळे वजन कमी करणे सहज शक्य आहे. तथापि, बहुतेक लोक वजन कमी करताना सामान्य चुका करतात. ते एकतर लोकांमध्ये पसरलेल्या दंतकथा आणि गैरसमजांवर विश्वास ठेवतात किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या शब्दावर अवलंबून राहतात. या अशा चुका आहेत ज्यामुळे आपले वजन कमी होत नाही. बरेच लोक वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चला तर, या सामान्य चुकांबद्दल जाणून घेऊया…(People made common mistakes during weight loss journey know about this mistakes)

वजन काट्यावर अधिक लक्ष देणे

वजन कमी करणे ही संख्या नाही. याचा अर्थ असा की, आपण निरोगी शरीरासह रोगांपासून दूर राहावे. जर आपण फक्त संख्येवर लक्ष केंद्रित केले, तर आपण पुरेसा पौष्टिक आहार घेणार नाही. यामुळे, आपण बर्‍याच समस्यांना सामोरे जाऊ शकता. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपल्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यास शरीराला हानी पोहोचू शकते.

पुरेसे वजन न उचलणे

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, अशा बहुतेक लोकांना वजन उचलण्यावर विश्वास नाही. तथापि, वजन उचलण्याने, आपल्या शरीराची तग धरण्याची क्षमता वाढते आणि आपले बॉडी पोस्चर देखील चांगले होते. विशेषत: जर आपल्याला आपल्या पोटावरची आणि मांडी वरची चरबी कमी करायची असेल, तर हार्ड वर्कआउट्स करणे खूप महत्वाचे आहे.

आहारात चरबीचे प्रमाण कमी करणे

प्रत्येक व्यक्ती ज्याला वजन कमी करायचे आहे, तो आपल्या अन्नातील चरबीचे प्रमाण कमी करतो. तथापि, हे आपल्या वजन कमी करण्यासाठी उपाय नाही. कमी चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला जास्त अन्न खाण्याची तलफ निर्माण होईल आणि भूकदेखील जास्त लागेल. यामुळे आपण अधिक अन्न खाल्ले जाते आणि वजन कमी करण्याची मेहनत देखील वाया जाईल.

पुरेसे प्रथिने न खाणे

निरोगी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास, आपले पोट बर्‍याच वेळेस भरलेले राहते. याशिवाय हे आपल्याला पुरेशी ऊर्जा देखील देते. वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये प्रथिने घेतल्यास आपण अन्नामध्ये कमी कॅलरी घेतो ज्यामुळे आपला चयापचय दर आणि स्नायू मजबूत होतात.

बर्न करण्यापेक्षा जास्त कॅलरी सेवन करणे

ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांच्यासाठी अनहेल्दी पदार्थ न खाणे अधिक कठीण असते. म्हणूनच सुरुवातीला आपण बर्निंगपेक्षा जास्त कॅलरी खाता. मात्र, वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी सेवन करा. पौष्टिक आहार आणि व्यायामाद्वारे आपण अधिक वेगाने वजन कमी करू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(People made common mistakes during weight loss journey know about this mistakes)

हेही वाचा :

Health Tips | गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! कमकुवत होऊ शकते रोग प्रतिकारक शक्ती!

दाढी मोठी असेल तर कोरोनाचा धोका अधिक?, पाहा डॉक्टरांचं म्हणणं काय…

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.