मुंबई : खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे मसाले हे फक्त चव वाढवत नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. या मसाल्यांमध्ये विविध पौष्टिक घटक असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात, तसेच आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात. बरेच प्रकारचे मसाले आणि औषधी वनस्पती आहेत जे चयापचय वाढविण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी कार्य करतात. (Pepper and turmeric are beneficial for weight loss)
काळी मिरी
काळी मिरी हा एक घरगुती मसाला आहे. या मसाल्यात पाइपरिन असते जे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आपले चयापचय वाढविण्याचे कार्य करते आणि चरबी शरीरात जमा होण्यास प्रतिबंध करते. शरीराची चरबी कमी करण्याबरोबरच यामुळे आपल्याला बराच वेळ भूक देखील लागत नाही. काळी मिरीमध्ये लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.
लाल मिरची
लाल मिरची ही जवळपास सर्वच खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीचा वापर केला पाहिजे.
दालचिनी
दालचिनी हा एक सुंगधित मसाला आहे. यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात जे भूक शांत करण्यास मदत करतात. हा मसाला उच्च चरबीयुक्त अन्नाचा प्रभाव कमी करण्यास मदत करते. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्याबरोबरच वजन कमी करण्यासही मदत होते. दालचिनी खण्यामुळे शरिरातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यास मदत होते.
मेथी
मेथीचे दाणे चव वाढविण्यासाठी वापरतात. मेथीमध्ये 45 टक्के फायबर असते जे फॅट कमी करण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार मेथीचे दाणे खाल्ल्याने तुम्हाला बराच काळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे एका भांड्यात रात्री पाण्यात भिजवा. आपण ते पाण्याने प्यावे किंवा अन्नात त्याचा समाविष्ट करा
हळद
हळदीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे वजन कमी करण्यास मदत करतात. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हळद सर्दी, पडसे, खोकला आणि ताप प्रतिबंधित करते. तसेच, हळदीत भरपूर प्रमाणात आढळणारे अँटीसेप्टिक गुणधर्म शरीरातील बुरशीजन्य संक्रमण काढून टाकते.
(महत्त्वाचं : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या काळात ‘या’ पदार्थांचे सेवन करा आणि इम्युनिटी वाढवा!https://t.co/OaOpxZW9YG#immunityboosters #VitaminC #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 27, 2020
(Pepper and turmeric are beneficial for weight loss)