त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी बटाट्याचा रस अशा पध्दतीने चेहऱ्याला लावा, होतील अनेक फायदे!
बटाटा खाणे आपल्या आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे. तेवढाच आपल्या त्वचेसाठी बटाटा फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क तयार करून त्वचेला लावू शकतो
मुंबई : बटाटा खाणे आपल्या आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे. तेवढाच आपल्या त्वचेसाठी बटाटा फायदेशीर आहे. आपण घराच्या घरी बटाट्याचा फेस मास्क तयार करून त्वचेला लावू शकतो. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे बटाट्याचा रस केसांना लावला तर केस गळती आणि कोंड्यामुळे होणारा त्रासही दूर होतो. (Potato juice is beneficial for many skin problems)
1. कोरडी त्वचा
साहित्य
1 बटाटा
1 चमचा बेसन
1 चमचा कोरफड जेल
तयार करण्याची पध्दत
बटाटा धुवून तो मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढा. या सर्व गोष्टी बटाट्याच्या रसात मिसळा आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहर्यावर आणि मानेवर लावा. पेस्ट कोरडे झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. बटाटे फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोहयुक्त असतात. सुरकुत्या, कोरडी त्वचा, लालसरपणा आणि काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस आपण चेहऱ्याला लावू शकतो.
2. डॉर्क सर्कल्स
साहित्य
2 कापसाचे गोळे
बटाटा रस
काकडीचा रस
तयार करण्याची पध्दत
यासाठी आपल्याला बटाट्याच्या रसामध्ये काकडीचा रस समान प्रमाणात मिसळावा लागेल आणि कापसाच्या सहाय्याने डॉर्क सर्कल्सवर लावावा लागेल. हे मिश्रण सुमारे 20 मिनिटांनंतर धुवा. यामुळे डोळ्यांखालील डॉर्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावली पाहिजे.
3. चेहऱ्यावरील मुरूम
साहित्य
1 बटाटा
1 चमचे मध
2 चमचे कोरफड जेल
तयार करण्याची पध्दत
सर्व प्रथम मिक्सरमध्ये बटाटे बारीक करून पेस्ट तयार करा आणि सर्व गोष्टी मिक्स करा. या सर्व गोष्टी मिक्स केल्यानंतर जाड पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावा आणि हे मिश्रण कोमट पाण्याने सुमारे 20 मिनिटांनी धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतील ‘ही’ योगासने, तुम्हीदेखील नक्की ट्राय करा!#beautytips | #skincare | #yoga | #beauty https://t.co/zqbiogPSVT
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
(Potato juice is beneficial for many skin problems)