बटाटे आपल्या चेहऱ्यासाठी जबरदस्त फायदेशीर, ‘हे’ नक्की वाचा…
बटाटे ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिनेही विकली जाते आणि बाजारात मिळते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत बटाटा सर्वांनाच आवडतात.
मुंबई : बटाटे ही एक भाजी अशी आहे जी बाजारात 12 महिनेही विकली जाते आणि बाजारात मिळते. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत बटाटा सर्वांनाच आवडतात. बटाटाचा वापर बहुतेक सर्व भाज्यांमध्ये होतो. यासह, फ्रेंच फ्राईज, बटाटा टिक्की, बर्गर, वडा पाव यासारखे सर्व प्रकारचे स्नॅक्सही बटाटापासून बनवले जातात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त उपयुक्त आहे. बटाट्यामुळे आपली त्वचा सुंदर, मुलायम, चेहऱ्यावरील डाग, पिपल्स आणि चेहरा ग्लो देखील होतो. (Potatoes are beneficial for your skin)
-तुम्हाला कोरड्या त्वचेची समस्या असेल तर बटाट्याचा वापर करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी बटाटा किसून घ्या. आता किसलेल्या बटाट्यात या गोष्टी मिसळा…
-दोन थेंब ग्लिसरीन
-दोन थेंब गुलाबपाणी
-अर्धा चमचा तांदळाचे पीठ
-अर्धा चमचे मध
– सर्व टाकल्यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिसळून द्या. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर सरळ पाण्याने चेहरा धुवा. आपण हा पॅक सतत 1 आठवड्यासाठी आपल्या त्वचेवर लावा आणि मग आपणास चेहऱ्यावर फरक जाणवेल.
फेस मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 1 कट केलेला बटाटा, 2 चमचा दूध, 3-4 थेंब ग्लिसरीन एका वाटीमध्ये हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा मग हे आपल्या चेहऱ्याला लावा आणि कमीतकमी 15-20 मिनिटे चेहऱ्यावर तसेत ठेवा. जेव्हा ते चांगले सुकेल तेव्हा ते पाण्याने धुवा. टॉवेलने पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरा.
-ग्लिसरीनचा उपयोग आपली त्वचा मॉइश्चरायझ करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर, बटाटा आपल्या त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकतो. यामुळे चेहरा ग्लो देखील करू लागतो.
-आपल्या चेहर्यावरील डाग दूर करण्यात आलू उपयुक्त आहे. आलूमध्ये लिंबू आणि मध मिसळा. हे मिश्रण आपण चेहऱ्याला लावले तर डागांपासून आपली त्वचा मुक्त होईल.2 चमचा बटाटाचा रस, 2 चमचा काकडीचा रस, 1 चमचा लिंबूचा रस आणि हळद
-हे सर्व साहित्य मिक्स करा आणि चेहऱ्यावर चांगले लावा. हे चेहऱ्यावर लावल्यानंतर साधारण पंधरा मिनिटे तसेच ठेवा ते कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हे लावले पाहिजे.
संबंधित बातम्या :
Indigestion | वारंवार अपचनाची तक्रार? ‘या’ सोप्या उपायांनी मिळेल आराम!https://t.co/5LIlh20LHF#Indigestion #healthcare
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 21, 2020
(Potatoes are beneficial for your skin)