गुळापासून घरी तयार करा ‘या’ चवदार डिश, पाहा रेसिपी !
गुळ हा प्रत्येक स्वयंपाक घरात मिळणारा लोकप्रिय पदार्थ आहे. गुळाची चव गोड असल्यामुळे अनेक लोकांना गुळ खायला फार आवडते.
मुंबई : गुळ हा प्रत्येक स्वयंपाक घरात मिळणारा लोकप्रिय पदार्थ आहे. गुळाची चव गोड असल्यामुळे अनेक लोकांना गुळ खायला फार आवडते. गुळ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने आणि व्हिटामिन बी यासारखे पौष्टिक घटक त्यात भरपूर प्रमाणात आढळतात. आज आम्ही तुम्हाला गुळापासून तयार होणाऱ्या तीन हेल्ही आणि चवदार डिश सांगणार आहोत. (Prepare tasty dish from jaggery See recipe)
-अर्धा वाटी गुळ 1 कप गरम पाण्यात मिसळा. एका भांड्यात एक चिमूटभर केशर आणि 2 वेलची घाला. हे मिश्रण गव्हाच्या पिठामध्ये चांगले मिसळा. हे पीठ एक किंवा दोन तास तसेच ठेवा. कढईत थोडे तूप गरम करावे आणि प्रत्येक मालपुआसाठी हे मिश्रण तीन चमचे घाला. दोन्ही बाजूंनी समान रीतीने शिजवा आणि गरम सर्व्ह करा.
-कढईत 1 कप भिजलेला रवा घ्या आणि त्याला गरम करून घ्या. 100 ग्रॅम गूळ 2 कप पाण्यात मिक्स करून, एक चिमूट वेलची पावडर, केशर, 50 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम पिस्ता आणि 3 चमचे साखर नीट मिक्स करावे आणि जोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स होत नाही तोपर्यंत मिक्स करा. तयार आहे आपला गुळाचा हलवा चला. आता गरमा गरम सर्व्ह करा.
-1 चमचे मिरपूड, 10-12 बदाम, 5 वेलची आणि 1 चमचे धणे हे सर्व मिक्स करून घ्या. कढईत 2 चमचे तूप गरम करावे आणि त्यात 500 ग्रॅम गूळ घाला. आता त्यात अर्धा चमचा आल्याची पूड, 1 कांदा, 1 चमचा बडीशेप आणि 1चमचा किसलेले खोबरे घालून मंद आचेवरून ठेवा . यानंतर हे थंड होण्यासाठी काही वेळ ठेवा तयार आहे आपला मसालेदार गुळ
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Prepare tasty dish from jaggery See recipe)