डाळींना वारंवार कीड लागते? ‘या’ ट्रिक्स वापराआणि फरक पाहा…

डाळींच्या साठ्यांना कीड लागणे ही एक सामान्य समस्या आहे. या लेखात, डाळींना कीड लागण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, मोहरीचे तेल, फॉइल पेपर आणि लिंबाची पाने. हे उपाय वापरून तुम्ही तुमच्या डाळी दीर्घकाळ सुरक्षित आणि कीडमुक्त ठेवू शकता. यामुळे डाळींचा नुकसान होण्यापासून बचाव होईल.

डाळींना वारंवार कीड लागते? 'या' ट्रिक्स वापराआणि फरक पाहा...
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 2:33 PM

स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ. ज्या घरात किचनमध्ये डाळ नाही असं एकही घर शोधून सापडणार नाही. भूक लागल्यास डाळ पटकन बनवता येते. शिवाय डाळीत प्रोटीन भरपूर असतं. या शिवाय डाळी डब्यात सुरक्षित राहतात. पण कधी कधी डाळींना कीडही लागते. अधिक काळ डब्यात ठेवल्याने कीड लागत असते. त्यामुळे ही कीड घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सूचवणार आहोत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

डाळींची योग्यप्रकारे साठवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डाळीला कीड लागू नये असं वाटत असल्यास, आम्ही इथे काही साधे आणि प्रभावी उपाय सांगत आहोत. त्याचे पालन केल्याने तुम्ही डाळींचं कीडींपासून संरक्षण करू शकता.

मोहरीचे तेल

तुम्हाला माहीत आहे का की सरसों का तेल म्हणजे मोहरीचे तेल लावल्याने डाळीला कीड लागण्यापासून बचाव होऊ शकतो? होय, तुम्ही बरोबर वाचलं. मोहरीच्या तेलात बॅक्टेरिया आणि फंगसला मारण्याचे गुणधर्म असतात. डाळींवर हे तेल लावल्यास डाळ खराब होत नाही. दुसरं कारण म्हणजे मोहरीच्या तेलाची तीव्र गंध कीड लागू देत नाही.

हे सुद्धा वाचा

तेल कस लावायचं

समजा तुम्हाला 1 किलो डाळ स्टोर करायची असेल तर त्यासाठी 1 चमचं मोहरीचं तेल घ्या. डाळ पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असावी, हे लक्षात ठेवा. नंतर तेल डाळीमध्ये मिसळा आणि हाताने त्याला चांगल्या प्रकारे घासून घ्या. नंतर डाळीला थोड्या वेळासाठी उन्हात ठेवा आणि नंतर ती जाड किंवा एयरटाइट कंटेनरमध्ये स्टोर करा.

फॉइल पेपर

ओलाव्यामुळेही डाळ खराब होत असते. डाळीत कीड होते. फंगस लागतात. अशा स्थितीत फॉइल पेपर उपयोगी ठरतो.

कस वापरायचं :

फॉइल पेपरचे छोटे छोटे तुकडे करा आणि डाळीच्या कंटेनरमध्ये ठेवा. यामुळे ओलावा टिकणार नाही आणि डाळ सुरक्षित राहील.

लिंबाची पाने

लिंब त्याच्या कडवटपणासाठी ओळखला जातो. यामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. लिंबाच्या पानांमुळे कीडे आणि फंगस दूर राहतात.

कस वापरायचं :

लिंबाच्या पानांना चांगले धुऊन त्यांना कोरडे करा आणि नंतर ती पानं डाळीच्या कंटेनरमध्ये ठेवा. ते कीड आणि फंगस मारण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. यासारखे साधे आणि प्रभावी उपाय वापरून तुम्ही डाळींना दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकता, त्यात कीडे लागणार नाहीत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.