Propose Day 2021 | प्रेम व्यक्त करण्याचा ‘हा’ रोमँटिक अंदाज बनवेल आजचा दिवस खास!
जर आपले खरोखर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर, ते त्यास मनापासून सांगावे लागेल आणि त्याच्या समोर आपल्याला आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतील.
मुंबई : जर आपले खरोखर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर, ते त्यास मनापासून सांगावे लागेल आणि त्याच्या समोर आपल्याला आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतील. परंतु, हे बोलणे जितके सोपे आहे, तितकेच हे करणे अतिशय कठीण आहे. तुम्हीसुद्धा बर्याच काळापासून या संधीची वाट पाहत असाल, तर आज 2021च्या ‘प्रपोज डे’चा दिवस अजिबात चुकवू नका. अन्यथा, असे आपण नुसताच विचार करत रहाल आणि ती व्यक्ती इतर कोणाच्या तरी प्रेमात पडेल. आजच्या दिवशी प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही अनोख्या टिप्स सांगणार आहोत, ह्यांचा वापर करून आपण आपला आजचा खास दिवस संस्मरणीय बनवू शकता (Propose Day 2021 special tips for memorable propose).
‘प्रपोज डे’ खास बनवण्यासाठी काही टिप्स :
1- आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू बनवून तो आपण हातावर गोंदवून घेऊ शकता. यानंतर, आपण आपल्या खास व्यक्तीस एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी नेऊन तिथेच गुडघ्यावर बसून गुलाबाचे फूल द्या आणि आपल्या हातावरील त्यांच्या नावाचे गोंदण दाखवा. तुमची ही शैली त्यांना नक्कीच खूप आवडेल.
2- आपल्या खास व्यक्तीचे काही निवडक फोटो घ्या आणि त्यातील काही फोटोंचे छान व्हिडिओ बनवा आणि त्या व्यक्तीला एखाद्या रोमँटिक ठिकाणी नेऊन तो व्हिडीओ मोठ्या स्क्रीनवर प्ले करा. यासह आपण आपल्या मनातल्या भावना देखील सांगा.
3- आपण आजच्या संपूर्ण दिवसाची योजना देखील बनवू शकता. आणि आवडत्या व्यक्तीसह संपूर्ण दिवस वेळ घालवू शकता. आपल्या स्वत:च्या हातांनी त्यांच्यासाठी काहीतरी खास बनवा आणि रात्रीच्या वेळी रेस्टॉरंटमध्ये रिंग देऊन त्या खास व्यक्तीला प्रपोज करा (Propose Day 2021 special tips for memorable propose).
4- आपल्या खास व्यक्तीस एखाद्या सुंदर ठिकाणी नेऊन, हृदयाच्या आकाराचा केक कापू शकता. केकवर आपला आणि आपल्या जोडीदाराचा फोटो असल्यास तो आणखी सुंदर दिसेल. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीस एक लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ आणि एखादी भेट देखील देऊ शकता.
5- आपण आपल्या खास व्यक्तीला स्वत:च्या हातांनी बनवलेले, प्रेमळ शब्दांनी ओतप्रोत ग्रीटिंग कार्ड देखील देऊ शकता. त्या कार्डमध्ये, आपल्या भावनांसह, काही आठवणी आणि फोटो तसेच त्याच्याबरोबर घालवलेले क्षण नमूद करा.
6- एक वर्ड क्लाऊड तयार करा, त्यावर काही शब्द आणि ओळी लिहा. ते पाहून तिला खूप आनंद होईल आणि आपण तिच्या सर्व गोष्टींचे किती निरीक्षण करता हे तिला जाणवेल. आपण तिला वारंवार बोलत असलेला प्रत्येक शब्द लिहा.
7- आपण इच्छित असल्यास, एखाद्या लाँग ड्राइव्हवर देखील जाऊ शकता. लाँग ड्राईव्ह दरम्यान एखाद्या सुंदर ठिकाणी नेऊन त्या खास व्यक्तीस लग्नाचा प्रस्ताव द्या. तसेच रात्री कँडल लाईट डिनरचे आयोजन करू शकता.
(Propose Day 2021 special tips for memorable propose)
हेही वाचा :
Propose Day 2021 | ‘प्रपोज डे’ खास बनवायचाय? मग ‘या’ बॉलिवूड कपल्सच्या आयडिया नक्की ट्राय करा!#ProposeDay | #Valentinesweek2021 | #Bollywood https://t.co/Y2Z2dl7mDh
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021