Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी ‘मुळा’ जबरदस्त फायदेशीर, वाचा !

सलाद, पराठे आणि भाजी तयार करण्यासाठी आपण मुळ्याचा वापर करतो. मुळा हे औषधी घटकांचा खजिना आहे

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी 'मुळा' जबरदस्त फायदेशीर, वाचा !
मुळा
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 3:15 PM

मुंबई : सलाद, पराठे आणि भाजी तयार करण्यासाठी आपण मुळ्याचा वापर करतो. मुळा हे औषधी घटकांचा खजिना आहे. जर नियमितपणे मुळ्याचे सेवन केले तर मधुमेह, कर्करोग दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे मुळा खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत महत्वाचे झासे आहे. (Radish is beneficial for boosting the immune system)

1. मधुमेहाच्या रूग्णाने जर दररोज सकाळी मुळाचे सेवन केले तर, त्यांना मधुमेहाच्या समस्येपासून लवकरच मुक्तता मिळते. तसेच दररोज हे खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

2. मुळा व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. बहुतेक लोक कोरोना कालावधीत व्हिटॅमिन सी पूरक आहार घेत असतात. अशावेळी मुळाचे सेवन करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते. हे नियमित खाल्ल्याने सर्दीसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

3. मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. त्यामुळे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत होते आणि यामुळेच आपल्या दररोजच्या आहारात मुळात असणे आवश्यक आहे. मुळ्याची आपण भाजी किंवा चटणी देखील करून खाऊ शकतो.

4. मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळाप्रमाणे त्याची पाने देखील गुणकारी आहेत. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.

5. मुळ्यामध्ये असलेल्या फॉस्फोरस आणि आर्यनमुळे आपल्या शरीरातील हीमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. ज्या लोकांनाच्या शरीरात हीमोग्लोबिन कमी आहे. त्यांनी मुळा आहारात घेतला पाहिजे.

6. मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करतात. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्ल्याने खूप फायदा होतो.

7. ज्या लोकांना भूक न लागण्याची समस्या आहे, त्यांनी मुळ्यावर काळे मीठ खावे. यामुळे भूक लागण्यास मदत होते.

8. मुळामध्ये व्हिटॅमिन ए देखील आढळते, म्हणून हे नियमितपणे खाल्ल्याने डोळ्यांचा प्रकाश वाढतो. दात आणि केस मजबूत होतात.

9. अशक्तपणा कमी करण्यासाठी देखील मुळ्याची भरपूर मदत होते.

10. मुळा नियमितपणे खाण्याने आतडे आणि मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Radish is beneficial for boosting the immune system)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.