Rath Saptami 2021 | रथ सप्तमीला सूर्याची पूजा करून रोगमुक्त झाले भगवान श्रीकृष्णाचे पुत्र, वाचा यामागची कथा!

असे मानले जाते की, या दिवशी भगवान सूर्याची पूजा केल्यास एखादी व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते आणि अपत्य नसलेल्या जोडप्याला संतान प्राप्ती होते.

Rath Saptami 2021 | रथ सप्तमीला सूर्याची पूजा करून रोगमुक्त झाले भगवान श्रीकृष्णाचे पुत्र, वाचा यामागची कथा!
रथ सप्तमी
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 2:40 PM

मुंबई : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथ सप्तमी 19 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान सूर्य देवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. एखादी व्यक्ती आजारी असल्यास ती रोगमुक्त होते, त्याच्या कारकिर्दीतील अडथळे दूर होतात आणि त्या व्यक्तीची प्रगती होते (Rath saptami 2021 special story of Lord shrikrishna’s son Shamb).

रथ सप्तमीच्या या शुभ दिवशी केलेले स्नान, दान, होम, पूजा इत्यादी गोष्टी हजारो पटीने जास्त फळ देतात. रथ सप्तमी ‘अचला सप्तमी’, ‘पुत्र सप्तमी’ आणि ‘आरोग्य सप्तमी’ म्हणूनही ओळखली जाते.

असे मानले जाते की, या दिवशी भगवान सूर्याची पूजा केल्यास एखादी व्यक्ती रोगमुक्त होऊ शकते आणि अपत्य नसलेल्या जोडप्याला संतान प्राप्ती होते. आपणसुद्धा खूप आजारी असल्यास किंवा स्वत:ला निरोगी ठेवू इच्छित असाल, तर रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब यांची आख्यायिका नक्कीच वाचा…

अशी आहे सांबची कथा…

एकदा भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला त्याच्या शारीरिक सामर्थ्यावर गर्व झाला होता. तो सतत सर्वांचा अपमान करत होता. वाईट वागण्यात तो कधीही मागे हटला नाही. एके दिवशी दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले, तेव्हा ते खूप दुर्बल दिसत होते. त्यांना पाहून, सांब त्यांची चेष्टा करु लागला आणि त्यांचा अपमान करु लागला. सांबच्या या वागण्याने संतप्त झालेल्या दुर्वासा ऋषींनी त्याला, तू कुष्ठरोगी होशील, असा शाप दिला. त्यानंतर सांबची स्थिती पाहून श्रीकृष्णाने त्यांला रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्यास सांगितले. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून सांबने या दिवशी भगवान सूर्याची पूजा केली. काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला (Rath saptami 2021 special story of Lord shrikrishna’s son Shamb).

तेव्हापासून रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करण्याची प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की, ही उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात. व्यक्ती रोगमुक्त होते आणि जीवनात पैशाची, संपत्तीशी आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही.

अशी करा पूजा

सूर्य देवाची पूजा करण्यासाठी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी आंघोळ करावी आणि तांब्याचा कलश घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर घराच्या बाहेर किंवा मध्यभागी सात रंगांच्या रांगोळी किंवा चौक बनवावा. चौरसाच्या मध्यभागी एक चारमुखी दिवा लावा आणि त्यास प्रज्वलित करा. यादिवशी सूर्य देवाला लाल रंगाचे फुल, रोली, अक्षत, दक्षिणा, गुळ चणे वगैरे अर्पण करा. दिवसभर गायत्री मंत्र किंवा सूर्य मंत्राचा जप करा. आदित्य हृदय स्तोत्र वाचा. त्यानंतर, गहू, गुळ, तीळ, लाल कपडा आणि तांब्याची भांडी एखाद्या गरीब व्यक्तीला दान म्हणून द्या.

(टीप : सदर माहिती मान्यतांवर आधारित असून, याद्वारे कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Rath saptami 2021 special story of Lord shrikrishna’s son Shamb)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.