मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा… मित्राशी संपर्क तुटला? असा साधा संवाद; ट्रिक्स येईल कामाला
काळ आणि अंतरामुळे जुनी मैत्री कमी होऊ शकते. पण चिंता करू नका! हा लेख मैत्री पुन्हा जोडण्याचे सोपे मार्ग सुचवतो. फोन कॉल करणे, अचानक भेट देणे, मनापासून बोलणे, एकत्र वेळ घालवणे आणि माफी मागणे यासारख्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रांशी पुन्हा जोडू शकता. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमची मैत्री आयुष्यभर टिकवू शकता.
मैत्री हे जगातील सर्वात मोठं नातं आहे. हे नातं कधीच तुटत नाही. हे नातं नेहमी अभेद्य राहतं. अडीअडचणीच्या काळात फक्त मित्रच धावून येतात. ते चांगले साथीदार असतात. त्यांच्याकडे आपण आपल्या सुख आणि दु:खाच्या गोष्टी शेअर करू शकतो. वेळप्रसंगी मदत मागू शकतो. भावाप्रमाणेच मित्र आपल्याशी वागत असतात. त्यामुळे ज्याच्याकडे मित्र आहेत, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो. जीवाला जीव देणारे मित्र भेटणं तसं मुश्किलच असतं.
मित्र हे सर्वात चांगले साथीदार असतात. ते आपले मार्गदर्शक असतात. ते आपल्याला एकाच वेळी हसवतात आणि रडवतात, ते आपल्यासाठी सुरक्षित आश्रय असतात. मित्र हे आपले सर्वात मोठे चियरलीडर्स असतात. पण हळूहळू, जीवनाच्या मार्गावर आपण आपल्या सर्वोत्तम साथीदारांसोबतचा संपर्क गमावतो. आपण लग्नानंतर कुटुंबात व्यस्त होतो, नोकरीत व्यस्त होतो, नंतर मुलांमध्ये व्यस्त होतो आणि मित्रांशी असलेला आपला संपर्क तुटतो. एक वळण येते जेव्हा आपल्याला मित्रत्वाची समतोल राखण्यात अडचण येते. पण तुम्हाला माहीत आहे का? मित्रत्वात ब्रेकअप नाही! त्यामुळे संपर्क तुटल्यानंतरही मित्रांशी संपर्क साधण्याचे काही मार्ग आहेत. त्याचा वापर करा आणि मित्रांना पुन्हा आपलंसं करा.
कॉल करा
मित्रांशी अनेक दिवस, महिने आणि वर्षापासून संपर्क नसेल तर त्याच्याशी संपर्क करा. त्याला फोन करा. त्याची विचारपूस करा. मित्र हा तुमचा मार्गदर्शक असतो. तो तुमच्या समस्यांना समजून घेतो आणि माफीही करतो. कधी कधी, स्पष्ट संवाद सर्व काही सुधारू शकतो, आणि लांब अंतर असलेली मित्रत्वाची नाती सुधरू शकतात. एक कॉल करा आणि त्याच्या सर्व तक्रारी ऐकून घ्या, तुम्ही पाहाल की सर्व काही लगेच ठिक होईल.
सरप्राइज द्या
अंतर हे मित्रत्वामध्ये अडथळे निर्माण होण्याचं एक कारण आहे. त्यामुळे मित्राला भेटण्यासाठी तुमच्या वेळापत्रकात थोडा वेळ काढा आणि अचानक त्याच्याकडे जाऊन त्याला आश्चर्यचकित करा. तो तुम्हाला एका क्षणात आलिंगन देईल. तुमचं हे अचानक सरप्राइज, अडथळे मोडून, मित्रत्वाच्या चुका सुधारू शकतात.
मनापासून बोला
संबंध सुधारण्यासाठी मनापासून बोलणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही मित्राशी प्रामाणिकपणे आणि खुल्या मनाने बोललात, तर तो तुम्हाला समजून घेईल. तो कदाचित तुमच्यासारख्या समस्यांचा सामना करत असू शकतो. कधी कधी, फक्त समोर बसून आणि मनापासून बोलल्यानेच सर्व गोष्टी स्पष्ट होऊ शकतात.
एक दिवस मित्रासाठी
मित्रासोबत एक दिवस घालवा. ज्या दिवशी त्याच्या आवडीनुसार ठिकाणी फिरायला जा, त्याच्या आवडत्या पदार्थांचा आनंद घ्या. तुमचा दिवस खास करण्यासाठी तुम्ही त्या दिवशी काय करणार याची एक यादी तयार करा. तुमच्या मैत्रीचा दिवस संस्मरणीय करा.
माफी मागा
अंतर, फरक आणि संवाद गमावल्यामुळे अनेकदा मैत्री तुटते. तुमच्या कामामुळे किंवा वर्तणुकीमुळे आलेल्या गॅपसाठी माफी मागा. एक साधं ‘सॉरी’ सर्व काही सुधारू शकतं. म्हणून सर्व चुका विसरा आणि माफी मागा, मित्रासाठी अजिबात अभिमान नका ठेवा!