Relationship Advice: रिलेशनशीपमधली ही गोष्ट कधीच कोणासोबत शेअर करु नका

नात्यात चढ-उतार येत असतात. पण नाते टिकले पाहिजे म्हणून दोन्ही बाजुने काळजी घेतली पाहिजे. रिलेशनशीपमधल्या कोणत्याही गोष्टी इतरांसोबत कधीच शेअर करु नये. कारण समोरची व्यक्ती तुमच्यासाठी कितीही खास असली तरीही ती तुमच्या पार्टनरपेक्षा महत्त्वाची असू शकत नाही. कोणत्या गोष्टी आहेत ज्या इतरांसोबत शेअर करु नये जाणून घ्या.

Relationship Advice: रिलेशनशीपमधली ही गोष्ट कधीच कोणासोबत शेअर करु नका
Relationship-tips
Follow us
| Updated on: Nov 27, 2023 | 5:51 PM

Good Relationship : कोणतेही नाते हे सत्य आणि विश्वासावर टिकलेले असते. कोणत्याही नात्यातला विश्वास निघून गेला तर ते नाते टिकू शकत नाही. छोटे भांडण झाले तरी काहीवेळा नाते लगेच तुटतात. नाते तुटण्यासाठी आपणच जबाबदार असतो. लक्षात ठेवा नात्यातील प्रत्येक गोष्ट इतरांसोबत शेअर करणे ही मोठी चूक आहे. रिलेशनशीपमधल्या काही गोष्टी या स्वत:कडेच ठेवल्या पाहिजेत. परंतु लोकांना त्याचे महत्त्व समजत नाही आणि ते इतर लोकांसोबत शेअर करतात. नात्यातील कोणत्या गोष्टी इतरांकडे शेअर करायच्या नाहीत जाणून घ्या.

वाद झाला असेल तर तो इतरांना सांगू नका

दोघांमध्ये जर कोणताही वाद झाला असेल तर तो इतरांना सांगणे ही वाईट सवय असू शकते. कारण तुमची बाजू तुम्ही सांगता. पण समोरच्या व्यक्तीची बाजू त्याला माहित नसते. त्यामुळे त्यावरुन तो तुम्हाला त्याचं मत सांगू शकतो. अगदी किरकोळ भांडणामुळे ही नाते तुटू शकते. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर एखाद्या गोष्टीमुळे नाराज असाल तर तुम्ही जोडीदारासोबतच त्यावर बोलले पाहिजे.

पैशाशी संबंधित समस्या शेअर करू नका

तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, तर सर्वांसमोर याबद्दल बोलू नका. यामुळे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकते. अनेक वेळा अशा गोष्टींमध्ये लोकं तुमची साथ देण्याऐवजी तुमची खिल्ली उडवू शकतात. त्यामुळे तुम्ही दोघांनी मिळून या परिस्थितीचा सामना करणे चांगले होईल.

वैयक्तिक गोष्टी शेअर करू नका

नाते कोणतेही असो ते विश्वासावर टिकते. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणासोबतही शेअर करु नका. दोघांमधला विश्वास कायम ठेवा. चांगल्या-वाईट गोष्टी विनोदाने इतरांसोबत शेअर करू नका. पार्टनरच्या कोणत्याही सवयी या इतरांसोबत शेअर करु नका. असं केल्याने तुमच्यातील नात्यात कटुता येऊ शकते. वाद झाले तरी दोघांनी मिळून तोडगा काढा. तिसऱ्याची मदत घेऊ नका.

शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.