रिलेशनशिप मंत्र: पुरुषांनो वेळीच बदला, ‘या’ सवयींमुळे महिला ‘अनकम्फर्टेबल’!

जमाना मॉर्डन असला तरी महिलांसोबत बोलताना शिष्टता पाळायला हवी. मात्र, अनेकवेळा काही माणसं मर्यादेचा भंग करतात. महिलांशी बोलताना दोन अर्थांच्या वाक्यांचा उपयोग केला जातो.

रिलेशनशिप मंत्र: पुरुषांनो वेळीच बदला, ‘या’ सवयींमुळे महिला ‘अनकम्फर्टेबल’!
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 11:37 PM

नवी दिल्ली : सार्वजनिक जागा (PUBLIC SPACES) असो वा कामाची ठिकाणं महिलेला सुरक्षिततेसोबत वावरण्यास अनुकूल वाटणं अत्यंत महत्वपूर्ण ठरतं. प्रत्येक महिलेला स्वतंत्र अनुभवाला सामोरे जावे लागते. प्रत्येक महिलेची कहाणी निराळी असते. विविध स्वरुपाचे कायदे बनविले तरी महिलांच्या शारीरिक सुरक्षिततेसोबत (PHYSICAL SECURITY) मानसिक सुरक्षिततेचा मुद्दा महत्वाचाच ठरतो. महिलांना सार्वजनिक वावरावेळी किंवा कामाच्या ठिकाणी असुरक्षितता किंवा बैचेनी (UNCOMFORTABLE) निर्माण करणाऱ्या विविध घटना घडतात. महिलांना पुरुषांच्या काही सवयी मनात बैचेनीच्या भावना निर्माण करतात. शारीरिक अंगलट असो बोलण्यात मर्यादेचा भंग यामुळे महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे सार्वजनिक वावर किंवा कार्यालयीन ठिकाणी महिलांसोबत वावरताना चार सवयी निश्चित टाळायला हव्यात.

शारीरिक लगट

महाविद्यालयात जाणाऱ्या युवतींना खरंतरं या अनुभवाला अधिक सामारे जावे लागते. मुलींशी चर्चा केल्यानंतर, अनौपचारिक संवाद वाढल्यानंतर मुले सीमीरेषा ओलांडण्याच्या प्रयत्न करतात. आपणच बेस्ट फ्रेंड असल्याचे सर्वार्थाने भासवतात. त्यातून शारीरिक लगट करण्याचा किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. मुलींच्या मनात अशाप्रकारची कृती असुरक्षिततेची भावना निर्माण करते. आपलं मन जाणणारा तसेच आपल्याला दिलासा देणारा मित्र मुलींना हवा असतो. मात्र, मैत्रीची रेषा धूसर करत शारीरिक अंगलट मुलींमध्ये बैचेनीची भावना निर्माण करते.

एकटक न्याहाळणं

काही पुरुषांमध्ये महिलांना एकटक न्याहाळण्याची सवय असते. सार्वजनिक ठिकाण असो की प्रवासाच्या जागा असे प्रकार हमखास नजरेस पडतात. अशावेळी महिलेला मनात बैचेनीची भावना घेऊन वावरावे लागतं. महिलांना अशाप्रकारच्या पुरुषांबद्दल मनात नेहमीच तिटकारा असतो. मुलगी फॅशनचे कपडे घालून घराबाहेर पडल्यानंतर न्याहाळण्याची सवय असते. मात्र, महिला-युवतींना अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात असुरक्षितता उत्पन्न होते.

शेरेबाजी

महिला असो मुलगी जवळून जात असताना शेरेबाजी करण्याची अनेकांना सवय असते. कपड्यांपासून ते चालीबोलीपर्यंत शेरेबाजी करण्याची सवय सोडत नाही. आपल्या बोलण्यामुळे मुली-महिलेच्या मनात निर्माण होणारी असुरक्षिततेची भावना खरंतर लक्षात घ्यायला हवी. सौंदर्य असो ड्रेस मुलींना सभ्य भाषेत कौतुक नक्कीच भावेल. मात्र, तिरकस भाषेत केली जाणारी शेरीबाजी मुली-महिलांना नक्कीच पसंत पडत नाही.

‘त्या’ गोष्टींवर चर्चा

जमाना मॉर्डन असला तरी महिलांसोबत बोलताना शिष्टता पाळायला हवी. मात्र, अनेकवेळा काही माणसं मर्यादेचा भंग करतात. महिलांशी बोलताना दोन अर्थांच्या वाक्यांचा उपयोग केला जातो. अशाप्रकारचे बोलणे महिलांना कधीही आवडत नाही.

संबंधित बातम्या

Weight loss : वजन कमी करायचंय? घरातीलच हे पदार्थ तुम्हाला मदत करतील…

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

Double Chin | हनुवटीखालील अतिरिक्त चरबीने त्रस्त आहात? डबल चिनपासून मुक्तीसाठी 5 उपाय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.