बॉडी टॅनिंगवर घरगुती उपाय करायचे असतील तर शॅंम्पू आणि कापूरचा पॅक वापरून पाहाच; पहिल्याच वापरात फरक दिसेल
बॉडी टॅनिंगवर घरगुती उपाय करायचे असतील तर शॅंम्पू आणि कापूरचा घरगुती पॅक एकदा तरी नक्की ट्राय करा. पहिल्याच वापरात तु्म्हाला फरक दिसून येईल.
सतत प्रवासामुळे किंवा, धुळ-प्रदुषणामुळे आपली त्वचा, हात-पाय टॅन होण्याची समस्या नॉर्मल आहे. त्यावर उपाय म्हणजे मग पार्लरमध्ये जाऊन ट्रीट करणे. पण ऑफिस, प्रवास, घऱातील कामे यासगळ्या गोंधळात तेवढा वेळ मात्र काढता येणं जरा कठीण होतं. मग त्याकडे शक्यतो आपण दूर्लक्षच करतो. पण असं न करता आता एका सोप्या उपायाने घरीच आपण हे टॅनिंग घालवू शकतो.
कापूर अन् चमचाभर शाम्पूचा रामबाण उपाय
घरगुती सोपे उपाय वापरून आपण बॉडी टॅनिंग बऱ्यापैकी कमी करू शकतो. आता तर हिवाळा सुरु होईल त्यामुळे त्वचा अजूनच काळवंडलेली आणि रखरखीत होते. त्यामुळे तुमच्या वेळेप्रमाणे जसं तुम्हाला सोयीस्कर असेल तशापद्धतीने तु्म्ही हे उपाय करून टॅनिंग कमी करू शकाल.
थंडी वाढले की, स्किन काळवंडते. डेड स्किनमुळे त्वचा अधिक काळपट दिसू लागते. आपल्याला खर्च न करता आणि वेळ वाचवत टॅनिंग काढायची असेल तर, कापूर आणि शाम्पूचा सोपा उपाय वापरून टॅनिंग काढू शकता. यासाठी विशेष साहित्यांची गरज नाही. अगदी कमी साहित्यात टॅनिंग निघू शकते. चला तर मग पाहुयात की हे टॅनिंग कसं काढू शकतो ते.
आधी साहित्य पाहूयात
कापूर
कॉफी पावडर
लिंबू
खोबरेल तेल
शाम्पू
साखर
टॅनिंग कसे काढायचे?
सर्वात आधी एका वाटीत कापूर पावडर, पिठी साखर, पिठी साखर नसेल तर मिक्सरमध्ये किंचीत बारीक करून घेतलीत तरी चालेल आणि कॉफी पावडर. हे सर्व साहित्य एकत्रित करून नंतर त्यात लिंबाचा रस, खोबरेल तेल आणि 1 चमचा शाम्पू घालून एकजीव करा. मिसळल्यानंतर तयार पेस्ट हात आणि पायांना किंवा जिथे तुम्हाला टॅनिंग वाटतेय तिथे लावा.
हा पॅक लावल्यानंतर किमान 10 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर हलक्या हातानेच स्क्रब करा. 5 मिनिटे स्क्रब केल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ करा.त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. या डी टॅन पॅकमुळे हाता – पायांचे डेड स्किन निघून जाईल. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून एकदाच करायचा आहे.
पहिल्याच दिवशीच तुम्हाला या पॅकचे हलके हलके रिझल्ट दिसायला लागतील. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा तरी हा पॅक नक्की लावा. यामुळे नक्कीच लवकर टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. शिवाय त्वचा मुलायम आणि चमकदारही दिसेल. पण समजा जर या पॅकमुळे तुम्हाला जळजळ जाणवू लागली किंवा लाल रॅशेश दिसून आले तर मात्र हा पॅक लगेचच धुवून टाका. त्यावर खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.