मिल्क पावडरमुळे चेहऱ्याचा रंग सुधारतो, कसा बनवावा टॅनिंग रिमूव्हल मास्क?
दुधाच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. मिल्क पावडर फेस मास्कमुळे तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ होते तसेच डागही दूर होतात. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर मिल्क पावडर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.
उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे या ऋतूत कडक सूर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा टॅनिंग किंवा काळ्यापणाची शिकार होते. यामुळे अनेकदा संवेदनशील त्वचेच्या लोकांनाही सनबर्नच्या वेदनेला सामोरे जावे लागते. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी मिल्क पावडर फेस मास्क घेऊन आलो आहोत. मिल्क पावडर फेस मास्कचा वापर केल्याने तुमच्या त्वचेचे रक्षण होते तसेच सनबर्न आणि टॅनपासून मुक्ती मिळते. दुधाच्या पावडरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. मिल्क पावडर फेस मास्कमुळे तुमची त्वचा मऊ आणि स्वच्छ होते तसेच डागही दूर होतात. जर तुम्हाला तेलकट त्वचेचा त्रास होत असेल तर मिल्क पावडर तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते, तर चला जाणून घेऊया मिल्क पावडर फेस मास्क कसा बनवावा.
फेस मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- दूध पावडर दोन चमचे
- कॉफी पावडर अर्धा चमचा
- पाणी थोडे
- खोबरेल तेल एक चमचा
मिल्क पावडर फेस मास्क कसा बनवावा?
- मिल्क पावडर फेस मास्क बनवण्यासाठी एक छोटी वाटी घ्या.
- नंतर त्यात दोन चमचे मिल्क पावडर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर घाला.
- त्यानंतर त्यात एक चमचा खोबरेल तेल आणि थोडे पाणी घालावे.
- मग तुम्ही या सर्व गोष्टी मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
- आता तुमचा मिल्क पावडर फेस मास्क तयार आहे.
मिल्क पावडर फेस मास्क कसा वापरावा?
- मिल्क पावडर फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा.
- त्यानंतर चेहऱ्यावर चांगले लावा.
- मग बोटांच्या साहाय्याने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.
- यानंतर सुमारे 5-7 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करत राहा.
- त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)