मुंबई : चेहऱ्यावर नको असलेले केस कुणालाच आवडत नाहीत. ते काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता की, असा एखादा कोणता मार्ग वापरला तर आपण त्याद्वारे चेहर्यांचे अवांछित केस काढून टाकू शकता. तुम्हाला देखील अशा समस्या असतील, तर आता चिंतामुक्त व्हा. आम्ही आपल्यासाठी अशा मेकअप टिप्स घेऊन आलो आहोत की, ज्याचा वापर करून आपण चेहऱ्यावरील नको असलेले केस सहज काढू शकता. (Remove unwanted facial hair at home)
कॉर्न स्टार्च आणि अंडी
अंड्यामध्ये फक्त पांढरा, कॉर्न स्टार्च आणि त्यामध्ये थोडी साखर टाका. यांची पेस्ट व्यवस्थित करून घ्या. नंतरही केलेली पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. मात्र, जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम असेतर जास्त ही पेस्ट लावू नये. कारण अंड्यांमधील व्हिटॅमिन ए असते. ते मुरुमांच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. कॉर्न स्टार्च आणि साखर आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. याशिवाय आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी मदत होते.
संत्राची साल आणि लिंबाचा रस
या दोन्ही फळांमध्ये अँटी बॅक्टेरिया आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे मुरुम आणि त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कार्य करतात. हे एक नैसर्गिक ब्लीचिंग आहे. जे आपल्या चेहऱ्यावरील केस कमी करण्यास मदत करते. चेहर्यावरील केस काढून टाकण्यासाठी संत्राची साल, लिंबाचा रस, बदाम किंवा ऑलिव्ह ऑईल आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील कसे कमी होतील.
संबंधित बातम्या :
ऐन पंचविशीतच केस पांढरे होतायत? ‘या’ नैसर्गिक रंगांनी मिळेल केसांना पोषण!https://t.co/G05u3KmbQN#GreyHair #NaturalHairColour #haircare
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
(Remove unwanted facial hair at home)