Skin Care : ‘हा’ फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा, होतील अनेक फायदे !

जेवनामध्ये जवळपास सर्वांनाच भात खाण्यास आवडतो. भात खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Skin Care : 'हा' फेसपॅक एकदा नक्की ट्राय करा, होतील अनेक फायदे !
आपले केस कमी वयात पांढरे होत असतील तर आपण आवळ्याचे तेल केसांना लावू शकतो. यामुळे केस पांढरे होणार नाहीत. आवळ्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार बनतात. आवळ्याचे तेल घरी तयार करण्यासाठी आपल्याला गुलाबपूड, आवळा आणि खोबऱ्याचे तेल लागणार आहे. सर्वात अगोदर आवळे बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाबपूड आणि खोबरेल तेल मिक्स करा आणि केसांना लावा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 4:26 PM

मुंबई : जेवनामध्ये जवळपास सर्वांनाच भात खाण्यास आवडतो. भात खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, फक्त भातच नव्हेतर भाताचे पाणी देखील आपल्या खूप फायदेशीर असते. मात्र, बर्‍याच वेळा भांड्यात भात शिजवताना उरलेले पाणी आपण टाकून देतो. मात्र, हे पाणी फेकण्याऐवजी रोजच्या आहारात समाविष्ट करा. याशिवाय केस आणि चेहऱ्यावर त्याचा उपयोग केल्याने बर्‍याच समस्यांपासून आराम मिळतो. (Rice water face pack is beneficial for the skin)

भाताच्या पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. भाताच्या ताज्या पाण्यात बेसन पीठ आणि लिंबू मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर होते. हे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून देखील काम करते. सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यासाठी तांदळाचे पाणी कॉटन बॉलमध्ये घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या.

कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा. केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात. तांदळाच्या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. तसेच, शरीरास संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करतात. तांदूळाचे पाणी हे एक उत्तम कंडीशनर देखील आहे.

शॅम्पूनंतर केसांवर ते कंडिशनर म्हणून वापरा. यामुळे एका भांड्यात तांदूळ आणि त्यापेक्षा दुप्पट पाणी घाला आणि उकळवा. उकळल्यानंतर भांडे मंद आचेवर झाकून ठेवा आणि थोडावेळ पाणी उकळू द्या. यानंतर, एक भात एका चमच्याने बाजूला काढा आणि तो व्यवस्थित शिजला आहे की, नाही ते तपासा. शिजल्यानंतर भात चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या व एका भांड्यात ते पाणी काढून घ्या. हे पाणी केसांवर किंवा त्वचेवर वापरा. हे पाणी प्यायचे असल्यास, त्यात थोडे तूप आणि मीठ घाला आणि नंतर प्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Rice water face pack is beneficial for the skin)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.