त्वचेसाठी ‘तांदळाचे पाणी’ फायदेशीर, वाचा फायदे…
जेवनामध्ये जवळपास सर्वच लोकांचा भात हा आवडता पदार्थ आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? भात जेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.
मुंबई : जेवनामध्ये जवळपास सर्वच लोकांचा भात हा आवडता पदार्थ आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? भात जेवढा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. तेवढेच भाताचे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी आणि विशेष करून आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. मात्र, बर्याच वेळा भांड्यात भात शिजवताना उरलेले पाणी आपण टाकून देतो. मात्र, हे पाणी फेकण्याऐवजी रोजच्या आहारात समाविष्ट करा. याशिवाय केस आणि चेहऱ्यावर त्याचा उपयोग केल्याने बर्याच समस्यांपासून आराम मिळतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात….(Rice Water is good for health)
-हे पाणी त्वचेसाठी चांगले क्लीन्झर आणि टोनर म्हणून देखील काम करते. सुरकुत्यापासून चेहऱ्याचे संरक्षण करते. यासाठी तांदळाचे पाणी कॉटन बॉलमध्ये घ्या आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर आपला चेहरा स्वच्छ धुवा.
-केस गळतीमुळे केस वाढत नाहीत किंवा इतर समस्या उद्भवत असतील, तर तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये असणारे अमीनो आम्ल केस गळण्यास प्रतिबंधित करतात. तांदळामध्ये व्हिटामिन बी, सी आणि ई आढळतात.
– तांदळाच्या पाण्यात भरपूर कार्बोहायड्रेट असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. तसेच, शरीरास संसर्ग होण्यापासून प्रतिबंधित करतात.
-तांदूळाचे पाणी हे एक उत्तम कंडीशनर देखील आहे. शॅम्पूनंतर केसांवर ते कंडिशनर म्हणून वापरा. यामुळे केसांची लवचिकता आणि केसांची गुणवत्ता सुधारते.
-मुरुमांच्या समस्येमध्ये देखील तांदळाचे पाणी फायदेशीर आहे. हे मुरुमांचा लालसरपणा, सूज आणि खरुज काढून टाकते आणि नवीन मुरुमांना तयार होण्यापासून प्रतिबंध करते. रात्री झोपताना दररोज चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावा.
-तांदळाचे पाणी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते, पाचक प्रणाली सुधारते आणि चयापचय दर वाढवते.
संबंधित बातम्या :
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!
Indoor Plants | ‘या’ इनडोअर वनस्पती तुम्हाला हवेतील विषारी घटकांपासून ठेवतील दूर#indoorplants #lifestyle #NASA #life https://t.co/TvnHZlqzyd
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
(Rice Water is good for health)