चेहऱ्याला लावा केशर आणि दुधाचा फेसपॅक, होतील अनेक फायदे!
सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता.
मुंबई : सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वांनाच आपली त्वचा निरोगी आणि चमकणारी हवी असते. परंतु व्यस्त वेळापत्रकांमुळे बहुतेक लोक त्वचेची काळजी घेऊ शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला एकदम कमी वेळेत आणि घरच्या घरी तयार करता येणार फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत होईल. (Saffron and milk face pack is beneficial for the skin)
आज आपण बघणार आहोत केशर आणि दुधाचा फेसपॅक यासाठी साहित्य
-5 चमचे दुध
– 3 ते 4 केशर पाने
-गुलाब पाणी
हे संपूर्ण एकत्र मिक्स करून घ्या आणि 30 मिनिटांसाठी तसेच ठेवा. यानंतर, आपल्या चेहर्यावर आणि गळ्यावर 2-3 तास ही पेस्ट तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे आपली त्वचा चमकदार होते. साधारण हे आठवड्यातून चार ते पाच वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा. याचे अनेक फायदे आपल्या त्वचेला होतील.
-दोन चमचे कलिंगडाच्या रसात एक चमचा दही मिसळा.
-हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा आणि ते 10 मिनिटे सोडा.
-साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा धुवा आणि त्वचा मॉइस्चराइझ करा. उन्हाळ्याच्या हंगामात, आपण शक्यतो त्वचा सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवली पाहिजे.
उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. बद्धकोष्ठता आणि गॅस ही एक मोठी समस्या बनली आहे जवळजवळ प्रत्येक माणूस यामुळे त्रस्त आहे. परंतु कलिंगडचे खाल्लाने केल्याने गॅस आणि बद्धकोष्ठतापासून मुक्तता मिळू शकते. कारण कलिंगड खाण्याने तुमचे पोट स्वच्छ राहते.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Saffron and milk face pack is beneficial for the skin)