‘या’ देशात मिळणार सॅनिटरी पॅड्स मोफत.. आता लायब्ररी-मॉलमध्येही मिळणार मोफत सुविधा!

स्कॉटलंडमधील महिलांना आतापासून पीरियडशी संबंधित उत्पादने मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. पीरियडशी संबंधित उत्पादने आता युथ क्लब, कम्युनिटी सेंटर आणि फार्मसीमध्ये मोफत उपलब्ध असतील. जाणून घ्या, काय आहे ही सुविधा.

‘या’ देशात मिळणार सॅनिटरी पॅड्स मोफत.. आता लायब्ररी-मॉलमध्येही मिळणार मोफत सुविधा!
‘या’ देशात मिळणार सॅनिटरी पॅड्स मोफतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 7:48 PM

मासिक पाळी (Menstrual cycle) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असूनही, आजही पीरियड्स ही लाजिरवाणी बाब मानली जाते. आजही लोक त्याबद्दल कुजबुजतात. आजही महिला दुकानातून पॅड घ्यायला किंवा मागायला लाजतात. दुकानदार काळ्या पॉलिथिनमध्ये पॅड गुंडाळतात. त्याचवेळी स्कॉटलंडने या सर्व कल्पना मागे टाकत जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. स्कॉटलंड हा जगातील पहिला देश बनला आहे जिथे मासिक पाळीशी संबंधित सर्व उत्पादने पूर्णतः विनामूल्य (Totally free) उपलब्ध असतील. स्कॉटिश संसदेने पीरियड उत्पादनांबाबत एक विधेयक मंजूर केले आहे. पीरियड उत्पादनांबाबत देशात कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार सर्व वयोगटातील महिलांना मासिक पाळीशी संबंधित उत्पादने मोफत मिळणार आहेत. 2020 मध्ये स्कॉटिश संसदेने एकमताने या कायद्याला मंजुरी (Approval of the Act) दिल्यानंतर आता त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दीर्घकाळ चालणारी मोहीम

पीरियड प्रॉडक्ट्स (फ्री प्रोव्हिजन) (स्कॉटलंड) कायद्यांतर्गत, स्थानिक प्रशासनाला पीरियड प्रॉडक्ट्स मोफत उपलब्ध करून द्यावे लागतात. हे विधेयक स्कॉटिश संसद सदस्य मोनिका लेनन यांनी मांडले. पीरियड पॉव्हर्टी संपवण्याची ही मोहीम 2016 पासून सुरू आहे.

या ठिकाणी मोफत सॅनिटरी पॅड्स मिळतील मोफत

आता सॅनिटरी पॅड्स किंवा पीरियडशी संबंधित उत्पादने युथ क्लब, कम्युनिटी सेंटर आणि फार्मसीमध्ये मोफत उपलब्ध असतील. याशिवाय, एका अहवालानुसार, विद्यापीठांच्या प्रशासनाला शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना स्त्रीविषयक स्वच्छता उत्पादनेही पुरवावी लागतील.

हे सुद्धा वाचा

त्यावेळी पॅड उपलब्ध होणे गरजेचे

सॅनटरी पॅडला सार्वजनिक स्थळी, शाळा, महाविद्यालये येथे अत्यावश्यक साहित्यात जागा द्यायला हवी. एखाद्या स्रीला जेव्हा त्याची आवश्यकता भासेल तेव्हा तिला उपलब्ध झाले पाहिजे. जरा कल्पना करा की, तुमच्या मासिक पाळी दरम्यान सॅनटरी पॅड उपलब्ध नसेल तर, तुमची काय अवस्था होईल. विचार केला तरी, अंगावर काटा येतो. परंतु, ही समस्या अद्यापही देशातील अनेक भागात पाहायला मिळते. जागतिक स्तरावरही अनेक देशात स्त्रीविषयक स्वच्छता उत्पादनांचा अभाव आहे. पण स्कॉटलंडचा सॅनटरी पॅडबाबतचा हा मोठा निर्णय संपूर्ण जगासाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.