तुमच्या हातातील मोबाईलने होऊ शकतो घात, जाऊ शकते तुमची नोकरी!
सध्याच्या काळात मोबाईलशिवाय आपण आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. आज प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्ट फोन दिसतो. मोबाईलमुळे जशा अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत तसे त्याचे दुष्परिणाम पण आहेत. मोबाईलचा अती वापर करुन तुम्ही आजाराला निमंत्रण तर देत नाही आहेत ना, याकडे वेळीच लक्ष द्या.
मुंबई : तुमच्या हातातील मोबाईल (mobile) तुमच्यासाठी कसा घात आहे, हे माहिती आहे का? कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात मोबाईल प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती झाला आहे. एक वेळ आपली प्रिय व्यक्ती सोबत नसेल तरी चालेल पण मोबाईलशिवाय आयुष्य कठिण. हे जरा अती वाटत असेल तरी आपल्या आयुष्यात मोबाईल महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे ऑनलाईनला महत्त्व आलं. घर बसल्या प्रत्येक गोष्टी ऑनलाईन (online) होतात. ऑनलाईन गोष्टीसाठी मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होतोय. शाळा असो किंवा ऑफिस, शॉपिंग असो किंवा बँकेचे काम आता सगळं एका क्लिकवर. महिलांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल आले. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मोबाईलचा वापरही अती वाढला आहे. मोबाईलचा दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या अती वापऱ्यामुळे तुमच्यावर दुष्परिणाम (Side Effects) होतात. चला तर बघूयात कसा हा मोबाईल आपला घात करतो.
1. तुम्ही होणार आंधळे – डोळे हा महत्त्वाचा अवयव आहे. मोबाईलचा सर्वात जास्त धोका डोळ्यांना होतो. मोबाईलमधून निघणारे हानिकारक लाईट आपल्या डोळ्यांवर परिणाम करतात. मोबाईल आणि लॅपटॉपचा अती वापरामुळे अनेकांना चष्मा लागला आहे. काहीना गंभीर डोकेदुखी, डोळे दुखणे, डोळे कोरडे पडणे अशाप्रकारचे त्रास होतात.
2. निद्रानाश – तुम्हाला रात्री झोप येत नाही. सकाळी उठल्यावर तुम्हाला अँसिडिटीचा त्रास होतोय. तुम्ही चिडचिड करत आहात. अगदी कामातही लक्ष लागत नाही आहे. तुम्ही रात्री झोपताना मोबाईल वापरता. बस मग हेच कारण आहे. अनेकांना रात्री झोपतानाही मोबाईल लागतो. आणि हाच तुमचा मोबाईल तुमचा आरोग्याचा मोठा शत्रू बनतो. चला मग लगेचच ही सवय सोडा. रात्री झोपण्यापूर्वी साधारण एक तासापूर्वी मोबाईल बाजूला ठेवावा.
3. मोडू शकते तुमची मान – हो, बरोबर जर तुम्ही मोबाईलचा अती वापर करत असाल तर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. मोबाईलवर अती वेळ राहिल्यास मान आणि हात दुखतात. एकाच पोजीशनमध्ये राहिल्यामुळे तुमची मान मोडू शकते.
4. तुमची नोकरी जाईल – तुम्हाला मोबाईल जास्त वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुमची नोकरी जाण्याची शक्यता आहे. मोबाईलवर सतत राहिल्यामुळे तुमचं कामाकडे दुर्लक्ष होतं. आणि काम चांगलं झालं नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते.
या आणि अनेक समस्या मोबाईलमुळे होतात. याकडे लक्ष द्या आणि मोबाईलपासून थोड्या थोड्या वेळेसाठी ब्रेक नक्की घ्या. उत्तम आरोग्यासाठी मोबाईल सें दूरी है जरूरी.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
संबंधित बातम्या