Beetroot side effects : बीट खाण्याचे हे आहेत दुष्परिणात, पाहा कोणत्या व्यक्तींनी खाऊ नये
बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण याच बीटचे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. सगळ्याच व्यक्तींना बीटचे फायदे खाल्याने फायदेच होतील असे नाही. कोणत्या व्य़क्तींना बीट खावू नयेत जाणून घ्या. चला तर मग जाणून घेऊया बीटरूट खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
Beetroot side effect : हिवाळ्यात बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोकं लोक बीटचे सेवन सॅलड किंवा मग ज्यूसच्या स्वरूपात करतात. बीटमध्ये असलेले पोषकतत्त्व त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे ठरतात. हिवाळ्यात आहारात बीटचा नक्कीच समावेश केला जातो. पण बीटचे काही तोटे देखील आहेत. बीटरूट खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम काय आहेत जाणून घेऊयात.
स्टोन होण्याची शक्यता
अभ्यासानुसार, बीटरूटमध्ये ऑक्सलेट असते ज्यामुळे स्टोन होऊ शकतात. म्हणूच बीटचा ज्युस रस कमी प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो. किडनी स्टोन असेल तर तुम्ही बीटरूट ज्यूस आणि सॅलड पूर्णपणे टाळावे.
अॅलर्जी होण्याची शक्यता
बीटरूटचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांना अॅलर्जी देखील होऊ शकते. यामुळे घसा जडपणा आणि ब्रोन्कोस्पाझम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्याचे सेवन टाळावे.
पचन संबधित समस्या
बीटचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी बीट कमी प्रमाणात सेवन करावे. यकृतालाही बीटचं अधिक सेवन धोकदायक ठरु शकते. बीटमध्ये असलेली खनिजे यकृतामध्ये जमा होऊ शकतात.
अस्वीकरण: वर दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती म्हणून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.