घरातील पालींपासुन कायमची सुटका मिळवायची आहे तर स्वयंपाकघरातील ‘या’ वस्तूंचा करा वापर
उन्हाळ्यात डास आपल्याला खूप त्रास देतात, याशिवाय भिंती आणि छताच्या कोपऱ्यांवर रेंगाळणारी पाल देखील खूप त्रास देतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप उपयुक्त आहेत.

घरातील किचनच्या भिंतीवर पाल फिरताना दिसली तर काही लोकांना किळस वाटते तर काहींना भीती. त्यातच जेव्हा हवामान गरम होते तेव्हा पाली बाथरूम, स्वयंपाकघर, खोल्यांच्या भिंती आणि छतावर दिसू लागतात. बहुतेक पाली या घरातील अशा ठिकाणी येतात जिथे त्यांना लहान कीटक खायला मिळतात, म्हणून घरातील कोपरे स्वच्छ ठेवा. यासाठी घरात औषध फवारले जातात. अशावेळी कॅमिकलयुक्त गोष्टींचा वापर जेवण बनवण्याच्या ठिकाणी करणं हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे त्यांचा वापर करताना आरोग्याविषयक धोक्यांचा विचार करावा लागतो. रासायनिक उपाय आरोग्यास हानीकारक असू शकतात. तर याला पर्याय म्हणून तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या वापरांने तुम्हाला पालीपासून सुटका मिळवा येईल. चला जाणून घेऊयात…
लसूण ही एक उपयुक्त गोष्ट
जेवणात वापरला जाणारा लसूण तुमच्या घरातून पाल पळवू शकतो, कारण लसणाच्या तीव्र वासामुळे पाली घरात येण्यापासून रोखले जातात. यासाठी लसणाच्या पाकळ्या सोलून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. तुम्ही लसणाचा रस काढून कांद्याच्या रसात मिसळू शकता आणि घरातील जेथे पाल येते त्या कोपऱ्यात फवारू शकता.
मिरचीचा स्प्रे बनवा
पाल पळवण्यासाठी पाण्यात काळी मिरी पावडर मिक्स करा. तयार मिश्रण स्प्रे बाटलीत भरा आणि जिथे पाल येतात तिथे फवारणी करा. घरातील इतर कोपऱ्यांमध्ये फवारणी करा. यामुळे पालींची संख्या कमी होते.
अंड्याचे कवच लावा
अंड्याचे कवच हे पालींपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. तुम्ही जर अंडी खात असाल अंड्याचे रिकामे कवच वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा. यामुळे पाली घाबरतील.
हे मसाले देखील प्रभावी
घरात थोडासा धूर केल्याने डास, माश्या आणि इतर कीटक घरातून निघून जातात. तुम्ही दररोज तुमच्या घरात असल्यास काही लवंग आणि तमालपत्र आणि कापूर जाळा. ते हळूहळू जळू द्या. यामुळे तुमच्या घरात धूर पसरेल, ज्यामुळे पाली पळून जातील. हे नियमितपणे केल्याने तुम्हाला कीटक आणि डासांपासून मुक्तता मिळते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)