Valentine’s 2023 : ब्रेकअप झाल्यानंतर देखील सिंगल म्हणून घ्या ‘व्हॅलेंटाईन डे’चा आनंद
अकेले रहने का मजा ही कुछ और है...., ब्रेकअप झालं असेल तर निराश होवू नका; एकटं आयुष्य जगण्यात देखील फार आनंद आहे... सिंगल म्हणून कसा घ्याल व्हॅलेंटाईन डेचा आनंद
Valentine’s 2023 : प्रत्येकाच्या आयु्ष्यात चढ – उतार येत असतात. अशा परिस्थितीत आपल्या जवळची अनेक माणसं आपल्या पासून दूर जातात. त्याचा त्रास तर होणारच. पण एकटं आयुष्य जगण्यात देखील फार आनंद आहे… म्हणून चांगल्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी स्वतःला स्वतःची साथ असेल तरी बस आहे… सध्या सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ ची चर्चा सुरु आहे. आजपासून प्रेमाच्या आठवड्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे प्रेमाच्या या आठवड्याचा आनंद देखील आपण घेतलाच पाहिजे. या आठवड्याचा आनंद घेण्यासाठी पार्टनर हवाचं असं काही नाही, सिंगल म्हणून देखील ‘व्हॅलेंटाईन डे’चा आनंद आपण घेवू शकतो.
सिंगल असाल तर कसा घ्याल ‘व्हॅलेंटाईन डे’चा आनंद ‘व्हॅलेंटाईन डे’ विवाहित आणि रिलेशनशिपमध्ये असलेले कपल साजरा करतात. आपल्या पार्टनर प्रति असलेलं आपलं प्रेम व्यक्त करुन कपल ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. शिवाय आपल्या आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देखील देतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी कपल आयुष्याचा आनंद घेत असतात, तर काही जण एकटे असल्यामुळे निराश होतात.
पण जर तुम्ही सिंगल आहात तरी सुद्धा ‘व्हॅलेंटाईन डे’ चा आनंद घेवू शकता कारण अकेले रहने का मजा ही कुछ और है… त्यामुळे चांगल्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी स्वतःला स्वतःची साथ असेल तरी बस आहे… कारण आपण जेवढं स्वतःला ओळखतो, तेवढं समोरचा आपल्याला ओळखू शकत नाही..
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या आठवड्याच एकटे असाल तर सोलो ट्रिपसाठी नवीन ठिकाणी जा.. नाही तर जवळपास असलेल्या चांगल्या ठिकाण वेळ व्यतीत करा. हॉटेलमध्ये जावून मस्त डीनरचा आनंद घ्या. मित्रांसोबत फिरायला देखील जावू शकता. ज्यामुळे आनंद आणखी वाढेल.
‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी तुम्ही आवडतीचा सिनेमा पाहू शकता. शिवाय एखादी वेब सीरिज जी तुम्हाला प्रचंड आवडते…ती पुन्हा बघा… तुमचे जे मित्र सिंगल आहेत त्यांच्यासोबत पार्टी देखील करु शकता. ज्यामुळे तुमच्यातील मैत्री आणखी घट्ट होईल. आयुष्यात एकच नातं असं आहे, जिथे आपण रागवू शकतो, चिडू शकतो.. ते नातं म्हणजे मैत्री…
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच व्यक्ती सोबत हवी… असा विचार देखील करु नये. प्रेमाच्या या सात दिवसांत आपण फक्त पर्टनरवर नाही तर, आपल्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तींवर देखील प्रेम व्यक्त करू शकतो.आई, बाबा, भाऊ, बहिण, बेस्टफ्रेंड.. अनेकांवर प्रेमाचा वर्षाव करु शकतो. प्रमेच्या या आठवड्यात अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला खास भेटवस्तू देतात आणि प्रेम व्यक्त करतात.