skin care tips | झोपण्यापूर्वी काही बदल करुन तर पाहा, त्वचेला येईल वेगळीच चमक
धावपळीच्या आयुष्यात त्वचेची काळजी कडे लक्ष देत नाही. परंतू रात्री झोपताना तुम्ही काही कामे केलीत तर त्याचा तुमच्या त्वचेला भरपूर फायदा होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला नेहमी त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल तर तुम्हाला झोपण्यापूर्वी या 5 गोष्टी करा.
मुंबई : धावपळीच्या आयुष्यात त्वचेची काळजी कडे लक्ष देत नाही. परंतू रात्री झोपताना तुम्ही काही कामे केलीत तर त्याचा तुमच्या त्वचेला भरपूर फायदा होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला नेहमी त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून दूर राहायचे असेल तर तुम्हाला झोपण्यापूर्वी या 5 गोष्टी करा.
1चेहरा पाण्याने धुणे आवश्यक आहे
त्वचेच्या काळजीसाठी, रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे आणि पहिली गोष्ट येते ती म्हणजे स्वच्छ पाण्याने चेहरा धुणे. आपण रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. कारण त्वचेची अशुद्धता दूर करण्यासाठी त्याच प्रमाणे तत्वचेवरील धूळ दुर करण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.
2. हर्बल फेस मास्क वापर
तुम्हाला सुंदर त्वाचा हवी असेल तर तुम्ही हर्बल मास्क लावला तर त्याचा तुम्हाच्या त्वचेवर खूप चांगाला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. हर्बल फेस मास्क त्वचेमध्ये हरवलेल्या पोषक घटकांव्यतिरिक्त ओलावा भरून काढतो. हर्बल मास्कमध्ये तुम्ही झोपण्यापूर्वी कोरफड, मुलतानी, काकडी किंवा चंदन पावडर या गोष्टींचा समवेश करु शकता.
3. त्वचेला मॉइश्चराइज करा
दिवसभर उन्हामध्ये राहून आपली तत्वाचा खूप रुक्ष होते. त्यामुळे झोपापूर्वी आधी चेहऱ्यासह संपूर्ण शरीरात मलई, लोशन किंवा नारळाचे तेल वापरा, यामुळे त्वचेत ओलावा येऊ शकतो. यामुळे अकाळी येणाऱ्या सुरकुत्याही बऱ्या होतात.
4. केसांची ही घ्या काळजी
त्वचेबरोबरच , तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केसांची मालिश देखील करू शकता. असे केल्याने तुमचा संपूर्ण दिवसांचा थकवा निघून जाईल आणि तुम्ही गाढ झोपू शकाल. गाढ झोपेमुळे तुमची त्वचा चमकू लागेल.
5. डोळ्यांची काळजी घ्या
डोळे हा शरीराचा सर्वात संवेदनशील भाग आहे, म्हणून त्याला अतिरिक्त काळजी आवश्यक आहे. डोळ्यांच्या सभोवतालच्या त्वचेवरील काळे डाग तसेच सुरकुत्या दूर करण्यासाठी डोळ्याच्या क्रीमचा वापर करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली क्रीम लावायला विसरू नका.
इतर बातम्या :
निरोगी त्वचा हवीय तर मग हे 5 फेसपॅक वापराच, काहीच दिवसांत रिझल्ट दिसेल!
प्रियांका चोप्राच्या तजेल त्वचेचं रहस्य, म्हणते, टेन्शन नाही, घरच्या घरी अशी घ्या काळजी!
निरोगी त्वचा हवीय तर मग हे 5 फेसपॅक वापराच, काहीच दिवसांत रिझल्ट दिसेल!https://t.co/P3XFTFPNKY#skincare | #turmeric | #facepack
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 20, 2021