Skin Care Tips : फेस मास्क लावताना करू नका ‘या’ चुका; चेहऱ्याची चमक होऊ शकते कमी!

Skin Care Tips : निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी बरेच लोक फेसमास्क वापरतात. परंतु, फेसमास्क लावताना काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा फेसपॅक प्रभावीपणे काम करत नाही. जाणून घ्या, फेसमास्क वापरतांना काय चुका करू नयेत.

Skin Care Tips : फेस मास्क लावताना करू नका ‘या’ चुका; चेहऱ्याची चमक होऊ शकते कमी!
Face PackImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 12:15 AM

मुंबई : कोणत्याही ऋतूमध्ये आरोग्याचीच नव्हे तर, त्वचेचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत अनेक लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस मास्कचा वापर करतात. हे फेसमास्क त्वचा तजेलदार (Bright skin) आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्वचेशी संबंधित समस्यांवर मात (Overcome problems) करण्यास मदत होते. कधीकधी आपली त्वचा निस्तेज आणि निर्जीव (Dull and lifeless) दिसू लागते. अशा परिस्थितीत हे फेस मास्क त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात. परंतु, त्यांचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अन्यथा ते फार प्रभावीपणे काम करत नाहीत. चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी फेस मास्क फायदेशीर मानले जाते. हे खोल पोषणासह त्वचेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करते. पण अनेकदा मुली फेस पॅक आणि मास्क लावताना काही चुका करतात. त्यामुळे चेहऱ्याला पूर्ण चमक येत नाही. याशिवाय तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया त्या छोट्या चुका…

हात आणि चेहरा न धुण्याची चूक

फेसमास्क लावण्यापूर्वी नेहमी हात आणि चेहरा धुवा. त्यामुळे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल, घाण साफ होते. अन्यथा त्वचेला फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते. अशा परिस्थितीत चांगले परिणाम मिळविण्यासाठी प्रथम हात आणि चेहरा धुवा.

न धुतलेल्या त्वचेवर फेस मास्क लावू नका

फेसमास्क नेहमी स्वच्छ त्वचेवर लावा. फेसमास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवा. अन्यथा, तुमच्या चेहऱ्यावर बॅक्टेरिया आणि स्कम जमा होतात. अशा परिस्थितीत फेसपॅक फारसे प्रभावीपणे काम करत नाही.

घाणेरड्या हातांनी फेस मास्क लावू नका

फेसमास्क वापरण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा आणि स्वच्छ करा. असे केल्याने तुम्ही चेहऱ्याला बॅक्टेरिया आणि हातातील घाणीपासून वाचवू शकाल. त्यामुळे हात व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्यावर फेस मास्क लावा. तुम्ही बोटांचा वापर न करता फ्लॅट फाउंडेशन ब्रश किंवा फेस क्लिन्जर ब्रशने फेस पॅक लावू शकता.

फेसमास्क जास्त काळ त्वचेवर ठेवू नका

बरेच लोक फेस मास्क लावल्यानंतर बराच वेळ असेच राहतात. हे हानिकारक असू शकते. यामध्ये अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्या तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतात. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. यामुळे त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा देखील होऊ शकतो. यासाठी, फेस मास्क लावण्यापूर्वी, त्याच्या पॅकेजिंगच्या मागील बाजूस दिलेल्या सूचना नीट वाचा आणि त्याचे पालन करा.

मॉइश्चरायझर

अनेकजण फेस मास्क लावल्यानंतर मॉइश्चरायझर वापरत नाहीत. फेस मास्क लावल्याने मॉइश्चरायझरचेही काम झाले आहे, असे त्यांना वाटते. पण तसे नाही. फेसमास्क लावल्यानंतर हलके हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा. तसे न केल्यास तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे फेसमास्क लावल्यानंतर मॉइश्चरायझर नक्कीच वापरा.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.