Skin Care Tips : दररोज प्या एक ग्लास हा ज्यूस, चेहरा उजळून निघेल
दररोज आपण खूप काही वेगवेगळे अन्न आणि फास्ट फूड खात असतो. पण तुम्हाला जर चांगली त्वचा हवी असेल तर तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास हा ज्यूस नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा चेहरा उजळून तर निघेलच पण डाग असतील तर ते देखील हळूहळू निघून जातील.
Skin care Tips : आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आज अनेकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. माणूस आज इतका व्यस्त झाला आहे की, त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ आहे. पण असे करणे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यात प्रदूषणामुळे या समस्येत आणखी भर पडली आहे. यामुळे त्वचा आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता.
कसा तयार करावा हा ज्युस
सर्व प्रथम बीटरूट, आवळा बारीक करा आणि हिरवी धणे बारीक चिरुन घ्या.
मिक्सरमध्ये हे चांगले बारीक करा आणि रस तयार करा. घट्ट झाल्यास त्यात थोडे पाणी घालू शकता.
या रसाचे 1 ग्लास नियमित सेवन केल्याने आठवडाभरात तुम्हाला फरक दिसू लागेल.
बीटरूट आणि आवळ्याच्या फायदे
चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात.
बीटरूट आणि आवळ्यापासून बनवलेला ज्युस जर तुम्ही पित असाल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा दिसून येईल. यामुळे सुरकुत्या निघून जातात. कारण यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते जे यासाठी मदत करते.
डाग काढून टाकतात
हा ज्युस नियमितपणे प्यायल्याने चेहऱ्यावरील सर्व डाग कमी होतात. हळूहळू ते डाग नाहीसे होऊन जातात. हे त्वचेला हायड्रेट ठेवते.
त्वचेला चमक देण्यासाठी उपयुक्त
बीटरूट आणि आवळा याचा रस त्वचा चमकदार आणि तरुण बनवण्यासाठी फायदेशीर आहे. हे रक्त शुद्ध करते आणि त्वचेला बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते.
अस्वीकरण – वरील दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही आरोग्याशी संबंधित समस्या असली की डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.